Test cricket Eng vs Ind cricketer rishabh pant showered praises from all over the world veterans raised something like this sakal
क्रीडा

'क्रिकेटचे कलाकार' ऋषभ पंतवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने भारतासाठी अत्यंत आवश्यक वेळी दबावाखाली केलेल्या शतकाचे क्रिकेट दिग्गजांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने भारतासाठी अत्यंत आवश्यक वेळी दबावाखाली केलेल्या शतकाचे क्रिकेट दिग्गजांकडून कौतुक होत आहे. बर्मिंगहॅम येथे पहिल्या दिवशी भारताची अवस्था ५ बाद ९८ अशी झालेली असताना, ८३ धावांवर नाबाद राहिलेल्या रवींद्र जडेजाच्या साथीने पंतने (१११ चेंडूत १४६) अतिशय मोक्याच्या वेळी दबावसदृश्य परिस्थितीत उल्लेखनीय फलंदाजी केली. या दोघांनी २३९ चेंडूत २२२ धावांची भागीदारी करून सामन्याची दिशा बदलून टाकली.

इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल करणाऱ्या पंतने आपल्या खेळीत २० चौकार आणि चार षटकार मारले. ‘‘अगदी अप्रतिम..! रिषभ पंत शाब्बास, रवींद्र जडेजाचेही कौतुक,’’ असे ट्विट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले. भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ट्विट करून रिषभचे कौतुक केले. ‘‘दबावाखाली कसोटी सामन्यातील फलंदाजीचे रिषभ पंतचे विशेष प्रदर्शन. रवींद्र जडेजाचेही कौतुक करावे तितके थोडेच,’’ असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यासह क्रिकेट जगतातील अनेक माजी खेळाडूंनी पंतच्या खेळीचे कौतुक केले, ते पुढील प्रमाणे...

  • वीरेंद्र सेहवाग : पंत स्वतःच्या लीगमध्ये

    आहे. तो जगातील सर्वात मनोरंजक क्रिकेटर आहे.

  • व्यंकटेश प्रसाद : रिषभ पंतची बॉक्स ऑफिस कामगिरी, आजची खेळी मी पाहिलेल्या सर्वोत्तम काउंटर-अटॅकिंग इनिंग्सपैकी. पंत एक खास खेळाडू आहे.

  • सुरेश रैना : पंत-जडेजाचे उत्तम मिश्रण, उत्तम भागीदारीबद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन!

  • हरभजन सिंग : संघासाठी अत्यंत आवश्यक वेळी शतकी खेळी, रिषभ पंतच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच..! अशीच कामगिरी कायम ठेव.

  • संजय मांजरेकर : पंत आजकाल मौजमजेत उत्तम कसोटी डाव खेळतोय! खेळीला सलाम!

  • कुलदीप यादव : रिषभ पंत आग हैं।

  • वसीम जाफर : रिषभ पंत सध्या कसोटीतील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे.

  • इयान बिशप : रिषभ पंतकडून ५ बाद ९८ अशी अवस्था असताना जडेजासह अभूतपूर्व खेळी.

  • रशीद खान : रिषभ पंत केवळ अप्रतिम खेळी, संघाच्या संकटात महत्त्वपूर्ण खेळी केलीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT