Kane Willamson Virat Kohli 
क्रीडा

'ते अगदी खास आहे': विल्यमसनने कोहलीच्या संबंधांचा केला उलगडा

सिद्धार्थ लाटकर

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, दोघेही एकमेकांना ‘सोबती’ म्हणून दीर्घ काळापासून ओळखत आहाेत.

सातारा : गेल्या आठवड्यात पहिल्या आयसीसी कसाेटी क्रिकेट विश्वकरंडक (ICC World Test Championship) स्पर्धेत न्यूझीलंडने (new zealand) भारताचा आठ गडी राखून पराभव करीत जेतेपदावर देशाचे नाव काेरेले. दक्षिण आफ्रिकेच्या साऊथॅम्प्टनच्या एजियास बाऊलमध्ये (ageas bowl) झालेल्या या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच फलंदाजीत न्यूझीलंड मातब्बर हाेते. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजयाच्या समीप असलेल्या न्यूझीलंड संघाने चाैकार (बाऊंड्री) मोजणीच्या नियमामुळे (boundary count rule) सामना गमावला हाेता. (thats-quite-special-new-zealand-kane-williamson-talks-about-his-relationship-with-indian-captain-virat-kohli)

भारताचे 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा केने विल्यमसन मधल्याफळीत खेळण्यास आला होता. सामना जिंकल्यानंतर विल्यमसनचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने काैतुक केले. हा सामना जिंकल्यानंतर विल्यमसनने कोहलीला मिठी मारल्याचा (Williamson hugging Kohli) एक छायाचित्र देखील व्हायरल झाला आहे.

या छायाचित्रावरुन विल्यमसनने नुकतेच कोहलीशी असलेल्या नात्याबद्दल एका किस्सा सांगितला. विल्यमसन म्हणाला आम्ही दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखताे. आम्ही ‘सोबती’ आहाेत असेही त्याने नमूद केले.

इंडिया टुडेशी बाेलताना विल्यमसन म्हणाला “विराट आणि मी बर्‍याच काळापासून एकमेकांना ओळखत आहोत आणि आम्ही जोडीदार (साेबती) आहोत. आम्हांला दाेघांना एकमेकांच्या छाेट्या छाेट्या गाेष्टी माहित आहेत. खेळामुळे तुम्हांला जगभरातील लोकांना भेटण्याची संधी मिळते. वेगवेगळ्या अनुभवांच्या माध्यमातून मैत्री दृढ हाेते. बर्‍याचदा आवडी निवडी एकमेकांना सांगितल्या जातात.

WTC Final Ind vs NZ

विश्वकरंडक पटकाविल्यानंतर संघातील खेळाडूंना उत्साहाचे उधाण आले हाेते. आनंदी वातावरणात सहका-यांवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवले याचा उलगडा विल्यमसनने केला. "मी खेळाडूंना शांत राहण्यास सांगत हाेताे. प्रयत्न करीत होतो पण ते माझे फारसे ऐकत नव्हते. सर्वजण खूप आनंदित हाेते. भावना प्रधान झाले हाेते. याचे प्रमुख कारण म्हणजे आमचा भूतकाळ. या अनुभवातून बरेच सहकारी या सर्वांतून गेले हाेते. अनेक वेळा यशाला हुलकावणी मिळत हाेती. यावेळी मला वाटते प्रत्येकाला जरासे वेगळे वाटले असले बहुधा.

"कर्णधार म्हणून मी कायम लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करीत असे. संघावर कायम विश्वास ठेवून वाटचाल सुरु ठेवली. हा क्षण गाठण्यासाठी सखाेल अभ्यास करुन पुढं मार्गक्रमण करीत राहिलाे. पारिताेषिके, बक्षीस आली किंवा नाही ती "माझ्यासाठी उपउत्पादने नाहीत," असं विल्यम्सनने म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT