सिडनी : अॅशेस मालिकेतील (The Ashes) चौथी कसोटी आजपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या सलामीवीरांपेक्षा पावसानेच बॅटिंग जास्त केली. (Ashes AUS vs IND 4th Test Live Updates)
पावसाने मधे मधे उसंत दिल्या कारणाने ऑस्ट्रेलियाने (Australia Cricket Team) बिनबाद अर्धशतकी मजल मारली. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला एका मागून एक धक्के देण्यास सुरुवात केली. चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) ऑस्ट्रेलियाचा फॉर्ममधला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) ३० धावांवर बाद केले.
यानंतर मार्नस लॅम्बुशग्ने आणि मार्कस हॅरिस यांनी ऑस्ट्रेलियाला शतक पार करुन दिले. मात्र ३८ धावांवर खेळणाऱ्या मार्कस हॅरिसला अँडरसनने (James Anderson) बाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. पाठोपाठ मार्क वूडने देखील कांगारुंना धक्का देत मार्नस लॅम्बुशग्नेला २८ धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला.
इंग्लंडचे गोलंदाज चांगल्या लयीत येत असतानाच पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग सुरु केली. त्यामुळे पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ ४६.५ षटकावरच संपवला. खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १२६ धावा झाल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) ६ तर उस्मान ख्वाजा ४ धावा करुन नाबाद होते.
दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १२६ धावा
46.5 : पावसाचा पुन्हा व्यत्यय; दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा
117-3 : मार्क वूडने कांगारुंचा तिसरा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवला, मार्नस लॅम्बुशग्ने २८ धावांवर बाद
111-2 : ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, सेट झालेला मार्कस हॅरिस ३८ धावांवर बाद
पावसाची उसंत, कांगारुंची शंभरी पार
21.4 : पावसाचा पुन्हा व्यत्यय, पंचांनी चहापानाची घोषणा केली तेव्हा ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या १ बाद ५६ धावा
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर ३० धावा करुन बाद
18.6 : वॉर्नर, हॅरिसची नाबाद अर्धशतकी सलामी
12.3 : लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद ३४ धावा
12.3 : पुन्हा पावसाचाच खेळ सुरु, सामना थांबला
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस मैदानावर
पावसाचा व्यत्यय, सामन्यास उशिराने सुरुवात
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.