मुंबई : बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आज महिला टी 20 चॅलेंज (The Women T20 Challenge) स्पर्धेबाबत महत्वाची घोषणा केली. त्यांनी महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही 23 ते 28 मे दरम्यान पुण्यात (Pune) खेळवण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोरोनामुळे महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही खेळवण्यात आली नव्हती.
महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेचा चौथा हंगाम हा पुण्यात आयोजित केला जाणार आहे. हा हंगामातील सामने 23 मे, 24 मे, 26 रोजी होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना हा 28 मेला होणार आहे. जय शहा यांनी याचबरोबर आयपीएलचे प्ले ऑफ हे अहमदाबाद आणि कोलकाता या दोन ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती दिली. याचबरोबर आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियवर होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आयपीएलच्या प्ले ऑफमधील क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर हे इडन गार्डवर 24 आणि 25 मेला होणार आङे. यानंतर क्वालिफाय 2 27 मे आणि फायनल 29 मेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.