the world cup in Statistics 2003 to 2023 by mohandas menon Sakal
क्रीडा

ICC World Cup 2023 : आकडेवारीतून विश्‍वकरंडक

पहिल्या तीन फलंदाजांना वासने पहिल्याच तीन चेंडूंवर बाद करून मैदान दणाणून सोडले होते.

सकाळ वृत्तसेवा

- मोहनदास मेनन

  • २००३ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत पीटरमारीटज्बर्गला मोठे नाट्य घडले होते. बांगलादेश विरुद्ध खेळताना श्रीलंकेच्या चमिंडा वासने पहिल्याच षटकात बांगलादेशच्या चार फलंदाजांना बाद केले होते. त्यातील पहिल्या तीन फलंदाजांना वासने पहिल्याच तीन चेंडूंवर बाद करून मैदान दणाणून सोडले होते.

  • पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अवघा १९ वर्ष ९० दिवसांचा असताना त्याने बांगलादेशच्या ५ फलंदाजांना २०१९च्या स्पर्धेत बाद केले होते आणि ते सुद्धा क्रिकेट पंढरी लॉर्डस् मैदानावर.

  • श्रीलंकन नुवान कुलसेकराच्या नावावर मजेदार नोंद आहे. २०१९ मध्ये कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार मारून महेंद्र सिंह धोनीने भारतासाठी विश्‍वकरंडक जिंकला होता तो दिवस होता २ एप्रिल २०११चा. त्याच कुलसकराने २०१५ मधील स्पर्धेत पहिला चेंडू १४ फेब्रुवारी २०१५ रोजी न्यूझीलंडसमोर खेळताना टाकला होता.

  • सर्वांत जास्त वयात शतक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर आहे. २०१५च्या वर्ल्डकप सामन्यात होबार्ट येथे स्कॉटलंडविरुद्ध दिलशानने ११ मार्चला शतकाची नोंद केली होती जेव्हा दिलशानचे वय ३८ वर्ष १४८ दिवस होते.

  • विश्‍वकरंडक स्पर्धेत मिळून सर्वाधिक शतके नोंदवण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर आणि रोहि-त शर्माच्या नावावर आहे. दोघांनी प्रत्येकी ६ शतकांची नोंद केली आहे. रोहित शर्माने २०१९ या एकाच विश्‍वकरंडकात पाच शतके काढून स्पर्धा दणाणून सोडली होती.

  • वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हीव रिचर्डस् क्रिकेट वर्ल्डकपचा पहिला असा फलंदाज ठरला ज्याने सर्वप्रथम एक हजार धावा काढल्या. ३० ऑक्टोबर १९८७ रोजी रिलायन्स वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना ६७ धावांची खेळी उभारताना कराची येथे त्यांनी हा टप्पा गाठला. तेव्हा रिचर्डस् यांचे वय ३५ वर्ष २३७ दिवस होते. त्यानंतर आत्तापर्यंत २० फलंदाजांनी विश्‍वकरंडक स्पर्धेत एक हजार धावा काढण्याचा पराक्रम पूर्ण केला आहे.

  • भारताकडून दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. त्यात चेतन शर्माची हॅटट्रिक वर्ल्डकप इतिहासातील पहिली हॅटट्रिक होती. ती त्याने १९८७ च्या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळताना नागपूरला घेतली होती. मोहम्मद शमीने २०१९मध्ये साउदम्पटनला अफगाणिस्तानच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूंवर बाद केले होते.

  • भारताचा लाडका फलंदाज सचिन तेंडुलकर एकमेव असा फलंदाज आहे ज्याने विश्‍वकरंडक स्पर्धेत २००० धावा काढायचा पराक्रम पूर्ण केला आहे. ९ मार्च २०११ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या नेदरलँडस् विरुद्धच्या सामन्यात सचिनने हा टप्पा गाठला. त्या वेळी सचिन तेंडुलकरचे वय ३७ वर्ष ३१९ दिवस होते. सचिनचा तो विश्‍वकरंडकातील ४०वा सामना होता. कारकिर्दीत विश्‍वकरंडकाचे ४५ सामने खेळताना सचिनने २२७८ धावा काढल्या जो विक्रम आहे. सचिन नंतर नंबर लागतो १७४३ धावा करणाऱ्या रिकी पाँटींगचा.

  • सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डीव्हिलीयर्स दोघांनी विश्‍वकरंडकात सर्वांत जलद १००० धावांचा टप्पा गाठला. दोघांनी २० व्या खेळीत १००० धावा १९९९ ते २०१५ दरम्यान पूर्ण केल्या. सचिनने २६ वर्ष ४५ दिवसांमध्ये हा टप्पा पूर्ण केला जो विक्रम आहे. त्यानंतर भारताच्या विराट कोहलीने ३० वर्ष २४३ दिवसांमध्ये पूर्ण केलेल्या १००० धावा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल याने भारतासमोर पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादमध्ये १७ मार्च २००७ रोजी केलेले अर्धशतक विश्‍वकरंडक इतिहासातील सर्वांत तरुण खेळाडूचे अर्धशतक ठरले. तमीम इक्बाल त्यावेळी १७ वर्ष ३६२ दिवसांचा होता.

  • आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर विश्‍वकरंडकातील सर्वांत तरुण शतकवीर म्हणून नोंद आहे. २० वर्ष १९६ दिवसांच्या पॉलने १८ मार्च २०११ च्या ईडन गार्डन, कोलकता येथील सामन्यात नेदरलँडस् विरुद्ध शतक ठोकले.

  • सर्वांत तरुण खेळाडू कॅनडाच्या संघाचा होता. आर. कुमार २०११ मध्ये विश्‍वकरंडकातील पहिला सामना खेळला तेव्हा तो १६ वर्ष २८३ दिवसांचा होता.

  • दोनच फलंदाजांची विश्‍वकरंडकात द्विशतकाची नोंद केली आहे. दोनही मोठ्या खेळी २०१५च्या स्पर्धेतच झाल्या. एक आहे वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि दुसरा आहे न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील. गेलने कॅनबेरामध्ये झिंम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात २१५ धावा काढल्या होत्या. गुप्टीलने वेस्ट इंडीजविरुद्ध २३७ धावांची खेळी वेलिंग्टनला उभारली होती.

  • दुसऱ्या‍या बाजूला सर्वांत जास्त वयात १५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर आहे. दिलशाने ३८ वर्ष १३५ दिवस वय असताना २६ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध नाबाद १६१ धावांची खेळी करून विक्रमाची नोंद केली होती.

  • १९८३ च्या विश्‍वकरंडकात झिंम्बाब्वे विरुद्ध खेळताना भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी १७५ धावांची झंझावाती खेळी करणारा भारतीय कर्णधार कपील देव यांचे वय २४ वर्ष १६३ दिवस होते. लहान वयात १५०पेक्षा जास्त धावांची खेळी या स्पर्धेत करायचा विक्रम अजूनही कपील देव यांच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT