Thomas Cup Final India vs Indonesia 3-0 to win maiden Thomas Cup title सकाळ
क्रीडा

बॅडमिंटनमध्ये तिरंगा फडकावला; भारताने पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप

भारताने थॉमस कप 2022 फायनलमध्ये रचला इतिहास

सकाळ ऑनलाईन टीम

Thomas cup 2022 final: भारताने थॉमस कप 2022 फायनलमध्ये इतिहास रचला आहे. भारताने सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप 2022 चे विजेतेपद मिळावले आहे. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने एंथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुस-या सामन्यात सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना एकेरीचा होता, ज्यामध्ये किदांबी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव केला.

मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या संघांना पराभूत करून भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केल्याने संघाचा आत्मविश्वास खूप मजबूत होता. आता अंतिम फेरीत 14 वेळा विक्रमी विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करून इतिहास रचला आहे.(Thomas Cup Final India vs Indonesia 3-0 to win maiden Thomas Cup title)

किदांबी श्रीकांत आणि जोनाथन क्रिस्टी यांच्यात तिसरा एकेरी सामना खेळला गेला. किदांबीने सुरुवातीपासूनच सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले आणि क्रिस्टीला कोणत्याही प्रकारे सामन्यात संधी दिली नाही. किंदाबीने क्रिस्टीचा 21-15, 23-21असा सरळ गेममध्ये पराभव केला. किदांबीच्या विजयाने टीम इंडियाने अंतिम फेरीत 3-0 अशी आघाडी घेतली.

दुसरा सामना दुहेरीत खेळला गेला ज्यामध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना केविन संजय आणि मोहम्मद अहसान या जोडीशी सामना झाला. यामध्ये इंडोनेशियन जोडीने पहिला गेम 21-18 असा जिंकला. तर दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने बाजी मारली आणि हा गेम 23-21 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. यानंतर तिसरा गेमही भारतीय जोडीने 21-19 अशा फरकाने जिंकला.

एंथनीने पहिला गेम 21-8 असा जिंकला, तर दुसरा गेम 21-17 असा जिंकून लक्ष्यने सामना बरोबरीत आणला. लक्ष्यने तिसरा गेम 21-16 असा जिंकून सामना जिंकला. या स्पर्धेत इंडोनेशियाचा मोठा विक्रम असून सध्याच्या स्पर्धेत तो आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तर भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये चीनी ताइपेविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला. पण आता भारताने अंतिम फेरीत इंडोनेशियाचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT