Tim Paine Said 4 -5 Guys Put Whole Test Series At Risk On India's 2020-21 Australia Tour esakal
क्रीडा

'त्या' 4 - 5 भारतीय खेळाडूंनी मालिका धोक्यात आणली : टीम पेन

अनिरुद्ध संकपाळ

सिडनी : ऑस्ट्रेलियात 2020 - 21 मध्ये झालेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक कसोटी मालिका होती. दुखापतींनी बेजार झालेल्या भारताने मालिकेत जोरदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत मात दिली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कसोटी संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली.

या मालिकेतील हिरोंवर व्हूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'बंदो में था दम' ही माहितीपट वजा मालिका दाखवण्यात येत आहे. या मालिकेत त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या टीम पेनने एका घटनेचा उल्लेख करत भारताच्या चार ते पाच खेळाडूंमुळे संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आली होती असे वक्तव्य केले. (Tim Paine Said 4 -5 Guys Put Whole Test Series At Risk On India's 2020-21 Australia Tour)

ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार टीम पेन म्हणाला की, 'मला असं म्हणायचं आहे की त्या चार पाच खेळाडूंनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली. तेही एक बाऊल नान्डोज चीप्स आणि अशाच काही पदार्थांसाठी. त्यावेळी मला ते खूप स्वार्थी वाटले होते.'

तिसऱ्या सिडनी टेस्टपूर्वी एका नाट्य घडले होते. काही भारतीय स्टार खेळाडूंना हॉटेल रूममध्येच राहण्यास सांगण्यात आले. कारण ते एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचा आढळून आले होते. त्यावेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला होता. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे मेलबर्नच्या विजयानंतर एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते.

यावर पॅट कमिन्सने देखील प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'यामुळे काही खेळाडूंना राग आला होता. विशेषकरून ज्यांनी ख्रिसमस त्यांच्या कुटुंबियांशिवाय घालवावा लागला होता. अनेक खेळाडूंनी काही ना काही त्याग केला होता. जेणेकरून ही कसोटी मालिका निर्विघ्नपणे पार पडावी. मात्र समोरचा संघ कोरोनाचे नियम गांभीर्याने घेत नव्हता.'

दरम्यान, या सगळ्यावर भारताचा त्यावेळचा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला की मेलबर्नमध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन्स माईंड गेम खेळत होते. भारतीय संघ कोरोना नियम मोडत असल्याचे जे काही वृत्त आले ते संपूर्णपणे खोटे होते.

अजिंक्य म्हणाला की, 'व्हायरल होणाऱ्या फोटोत जे खेळाडू दिसत आहेत ते खरं तर त्यांची टेकअवे ऑर्डर घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये उभे होते. खराब हवामानामुळे त्यांना आत उभे राहणे भाग होते. माध्यमांमध्ये आलेली बातमी चुकीची आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाने सांगितले होते की ज्यावेळी तुम्ही मेलबर्नवरून सिडनीला जाल त्यावेळी तुम्हाला हॉटेलमधून बाहेर येता येणार नाही. तुम्हाला विलगीकरणात रहावे लागेल. दुसरीकडे सिडनीतील बाहेरचे जग संपूर्णपणे सामान्य होते. तेथे लॉकडाऊन नव्हता. प्रत्येकाला इकडे तिकडे फिरण्याची मुभा होती. फक्त खेळाडूंनाच बंदिस्त करण्यात आले होते. आम्हाला माहिती होतं की ऑस्ट्रेलियाने माईंड गेम खेळण्यास सुरूवात केली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT