Today Runmukteshwar Wins In KSA Football Competition  
क्रीडा

कोल्हापूर : ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळाचा संध्यामठ संघावर विजय 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरूण मंडळविरूद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ संघातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. दुपारच्या सत्रातील सामन्यात ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळाने संध्यामठ तरूण मंडळावर 1-0 असा विजय मिळविला. 

सायंकाळी शिवाजी तरूण मंडळ विरूद्ध फुलेवाडी संघात सामना झाला. दोन्ही संघात नामवंत खेळाडूंचा भरणा असल्याने सामाना पाहण्यासाठी फुटबॉलशौकिनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दोन्ही संघांनी परस्परांचा अंदाज घेत चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात कसा राहिल या दृष्टीने प्रयत्न केला. "शिवाजी' चे खेळाडू पूर्वार्धात अधिक आक्रमक वाटत होते. "फुलेवाडी'च्या खेळाडूंनीही बचावफळी भक्कम ठेवली.

शिवाजीकडून यांचा आक्रमक खेळ

"शिवाजी'कडून संकेत साळोखे, करण चव्हाण, रणवीर जाधव, प्रथमेश कांबळे, साहिल निंबाळकर यांनी आक्रमक खेळ केला. 17 व्या मिनिटाला अबीयीने दिलेल्या पासवर करण चव्हाण-बंदरे याने मैदानी गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. "फुलेवाडी'कडून अक्षय मंडलिक, मिशेल, रोहित मंडलिक, राजू दास यांनी गोलच्या परतफेडीसाठी प्रयत्न केले. पूर्वार्धात 1-0 आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात "शिवाजी'च्या सुमित जाधव, संकेत साळोखे, रणवीर जाधव, आकिब यांनी आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. फुलेवाडीच्या खेळाडूंनी गोलच्या परतफेडीसाठी प्रयत्न सुरू केले. अशाच एका आक्रमणात राजू दास याने गोल नोंदवून 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्याच्या शेवटच्या सेकंदापर्यंत हा गोलफरक कायम राहिला. दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण मिळाला. तत्पुर्वी दुपारच्या सत्रातील सामन्यात "ऋणमुक्तेश्‍वर'ने संध्यामठ तरूण मंडळावर 1-0 असा विजय मिळविला. स्वराज्य पाटील याने विजयी गोल नोंदविला. 

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी 

केएसएने आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन संघाना समज पत्रे दिली गेली आहेत. खंडोबा तालीम मंडळ (अ), प्रॅक्‍टीस क्‍लब तसेच बीजीएम स्पोर्टसला समज दिली आहे. प्रॅक्‍टीसचा खेळाडू पीटर सेह याने प्रेक्षकांकडे पाहून हावभाव केले होते. गोलरक्षक परवीन बलवीरसिंग याच्यावर असाच आरोप ठेवला गेला आहे. मैदानात बंदी असलेल्या भागात प्रवेश करणे या कारणाचा समावेश आहे. "खंडोबा' व बीजीएमलाही बंदी असलेल्या भागात प्रवेश केल्याबद्दल समज देण्यात आली आहे. 


गुरूवारचे सामने 

  • मंगळवार पेठ तरूण मंडळ विरूद्ध उत्तरेश्‍वर प्रासादिक 
  • बालगोपाल तालीम मंडळ विरूद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) 

संबंधीत बातम्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT