भारतीय बॉक्सर सतीश कुमारला (Satish kumar) (प्लस 91) वजनी गटातील लढतीत विश्व चॅम्पियन बखोदिर जालोलोव विरूद्धच्या दमदार कामगिरीनंतर क्वार्टर फायनलमध्ये (quarterfinals) पराभवाचा सामना करावा लागला. माथ्यावर आणि हनुवटीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला 7 टाके पडले होते. या अवस्थेतही माघार न घेता तो रिंगमध्ये मोठ्या धाडसाने शेवटपर्यंत लढला. भारताच्या जखमी वाघाने प्री क्वार्टर फायनलमध्ये जमेकाच्या रिकार्डो ब्राउनला मात दिली होती. पण क्वार्टर फायनलमध्ये त्याला 5-0 असा पराभव स्विकारावा लागला. प्री-क्वार्टर फाइनलमधील सामन्यात त्याला दोन टाके पडले होते. (tokyo olympics 2020 boxing jalolov bakhodir vs satish kumar quarterfinal ass97)
32 वर्षीय आर्मी मॅन खली सतीशने डाव्या हाताने काही जबरदस्त पंच मारले. परंतु, उज्बेकिस्तानचा जालोलोव याने त्याचे इरादे हाणून पाडत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. तिसऱ्या राउंडमध्ये सतीशच्या माथ्यावरील टाके निघले. तरीही तो लढत राहिला. मुकाबले में हावी रहे. तीसरे दौर फुटबॉलर ते बॉक्सिंग असा प्रवास करणाऱ्या जालोलोव ने या सामन्यातील विजयासह आपले पहिले वहिले ऑलिम्पक पदक निश्चित केले. मॅच आपल्या नावे केल्यावर प्रतिस्पर्ध्याने सतीशच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले.
महिला गटात पदकाची आस असलेल्या सहावेळच्या जागतिक चॅम्पियन मेरी कोमचा स्पर्धेतील प्रवास यापूर्वीच संपुष्टात आलाय. दोन वेळची आशियाई चॅम्पियन पूजा रानी (75 किलो) आणि जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील कांस्य पदक विजेती सिमरनजीत कौर (60 किलो) यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
बॉक्सिंगमध्ये एक मेडल पक्के
भारतीय बॉक्सर ते ऑलिम्पकमधील कामगिरी निराशाजनक राहिली. मेरी कोम, अमित पंघल, विकास कृष्ण यांच्याकडे पदकाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले गेले. पण त्यांच्या पदरी अपयश आले. बॉक्सिंगमध्ये महिला गटात लोविना बोरगोहेन हिने सेमी फायनल गाठत भारताचे पदक निश्चित केले आहे. 69 किलो वजनी गटात तिने लक्षवेधी कामगिरी केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.