deepika kumari Twitter
क्रीडा

Tokyo Olympics: रँकिंग राऊंडमध्ये दीपिका नवव्या स्थानावर

तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाने पहिल्या रँकिंग राउंडमध्ये पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीय. भारताने तिरंदाजीच्या (Archery) माध्यमातून स्पर्धेला सुरुवात केलीये. महिला गटातील रँकिंग राउंडमध्ये दीपिका कुमारीने हात आजमावला. तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाने पहिल्या रँकिंग राउंडमध्ये पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले. पहिल्या राउंडमध्ये 120 पैकी 111 गुण मिळवत ती दहव्या स्थानावर राहिली. सहाव्या राउंडमध्ये दीपिकाने 57 गुणांसह आपला स्कोअर 334 वर नेत चौथ्या स्थानावर पोहचली. पण तिच्या कामगिरीत पुन्हा घसरण झाली. महिला वैयक्तिक वर्गवारीतील राउंड रँकिंगमध्ये तिला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (tokyo olympics 2020 day 1 india archery updates of deepika kumari atanu das tarudeep rai and pravin jadhav)

कोरियाच्या एन सॅन हिने 680 गुणांसह नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. राउंड रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवले. वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्यात ती केवळ 12 गुणांनी मागे पडली. महिला गटात यापूर्वी युक्रेनच्या लीना हेरासिमेकोने 1996 मध्ये अटलांटा ओलिम्पिक स्पर्धेत 673 गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. हा विक्रमाच्या जवळ पोहचत कोरियन खेळाडूने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

रँकिंग राउंडमध्ये 64 खेळाडू सहभागी असून आता पुढील फेरीत दीपिकाचा सामना हा भूतानच्या कर्मा विरुद्ध होईल. भूतानच्या या खेळाडूटा वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर (616) आहे. जो तिने रँकिंग राउंडमध्येच केलाय.

तिरंदाजी रँकिंग राउंड नियम

आर्चरी रँकिंग राउंडमध्ये 64 तिरंदाज 70 मीटर अंतरावरुन 72 निशाणा मारतात. यातून कोणताही खेळाडू आउट होत नाही. या कामगिरीच्या जोरावर त्यांचा ड्रॉ तयार केला जातो. अव्वलस्थानावरील स्पर्धक विरुद्ध 64 व्या स्थानावरील स्पर्धक अशा पद्धतीने पुढील फेरीतील लढत खेळवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT