MC Mary Kom  Twitter
क्रीडा

Olympics : सुपर मॉमचा स्पर्धेतील प्रवास थांबला!

51 किलो वजनी गटात मेरी कोमकडून पदकाची आस होती.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सातव्या दिवशी महिला बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारताला मोठा धक्का बसला. जिच्याकडून पदकाची आस होती त्या मेरी कोमचा स्पर्धेतील प्रवास थांबलाय. कोलंबियाच्या इनग्रित वेलेंसियाने हिने 3-2 अशा फरकाने तिला पराभूत केले. 51 किलो वजनी गटात मेरी कोम दमदार कामगिरी करुन भारताच्या पदरात पदकाची भर घालेल, अशी आशा होती.

पहिल्या राऊंडमध्येच वेलेंसियाने मेरी कोमला बॅकफूटव ढकलले. दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कोमने दमदार कमबॅक करत लढत सहजासहजी सोडणार नाही, याचे संकेत दिले. पण तिसऱ्या राउंडमध्ये वेलेंसिया आक्रमक खेळ करत भारी ठरली. (Indian star boxer MC Mary Kom out of Tokyo Olympics after losing to Colombias Ingrit Lorena Victoria Valencia in womens 51kg by 3 2)

वेलेंसियाला पंचांनी 30,29, 27, 29 आणि 28 अंक दिले. तर मेरी कोमला 27, 28, 30, 28, आणि 29 असे गुण मिळाले. यापूर्वी सतीश कुमार याने 91 किलो वजनी गटात विजय मिळवत धमाक्यात पदार्पण केले होते. आता त्याच्याकडून पदकाची आस आहे. 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमने वयाच्या 18 व्या वर्षी बॉक्सिंगमध्ये करियरला सुरुवात केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 38 वर्षीय मेरी कोम भारताची ध्वजवाहक होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा तिच्या कारकिर्दीतील शेवटची ठरु शकते. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कांस्य पदकाची कमाई केली होती. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करत ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आपल्या नावे करेल, असे वाटत होते.

2001 मध्ये मेरी कोमने कारकिर्दीतील पहिले वहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले होते. अमेरिकेतील महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात तिने रौप्य पदकाची कमाई केली होती. 2002 ते 2008 दरम्यान तिने 10 पदके मिळवली यात 9 सुवर्ण पदकाचा समावेश होता. 2009 ते 2019 या कालावधीत मेरी कोमने 12 पदकांची कमाई करताना 9 सुवर्ण पदके पटकावली. तिचा हा प्रवास थक्क करुन सोडणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT