क्रीडा

'आर्मी मॅन'मुळे टोकियोत वाजली 'जन-गण-मन'ची धून; नीरजला गोल्ड

2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय. नीरज चोप्रा आणि जर्मनीचा जोहान्स वेट्टर यांच्यात चुरस पाहायला मिळेल असे वाटत होते. पण जर्मनीच्या खेळाडूसह अन्य कोणत्याही खेळाडूला त्याच्या जवळपासही भाला फेकता आला नाही. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर भारताला वैयक्तिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

पात्रता फेरीत टॉपर राहिलेल्या नीरज चोप्राने फायनल इवेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकले. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला. चौथ्या प्रयत्नात तो फेल त्याची भाला फेक फॉल ठरली.

2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. 20 वर्षांखालील स्पर्धेत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची आस होती. त्याने हा विश्वविक्रम रिओ ऑलिम्पिक कॉलिफिकेशनच्या शेवटच्या दिवशी नोंदवला होता. त्यामुळे मागील ऑलिम्पिकमध्ये तो ऑलिम्पिक खेळताना दिसला नव्हता. पण यंदा तो मैदानात उतरला आणि त्याने सुवर्ण स्वप्नपूर्ती साकार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT