बॉक्सिंगच्या रिंगमध्ये 91 हेवी वजनी गटात सुतिश कुमारने लक्षवेधी कामगिरी नोंदवलीये. गुरुवारी झालेल्या लढतीत त्याने जमेकाच्या ब्रावन रिकोर्डो विरुद्ध आक्रम खेळ केला. प्रतिस्पर्ध्याला त्याने अजिबात संधी दिली नाही. तो ज्या तोऱ्यात खेळला ते पाहण्याजोगे होते. पहिला राउंड 5-0 आणि दुसऱ्या राउंडमध्ये 4-1 अशा फरकाने जिंकत सतिश कुमारने क्वार्टर फायनल गाठलीये. ऑलिम्पिक स्पर्धेत 91 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा तो पहिला बॉक्सर आहे.
2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सतिश कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात वसलेल्या पचौता गावातील बॉक्सरला पहिल्या फेरीत न खेळताच विजय मिळाला. त्याच्या प्रतिस्पर्धीने माघार घेतल्यामुळे त्याला रिंगमध्ये उतरण्याची वेळच आली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्यातील कसब दाखवून दिले. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या सतिश कुमार सुवर्ण पदक मिळवण्याच्या इराद्याने टोकियोच्या मैदानात उतरलाय.
भारतीय लष्करात नायक सुभेधार पदावर कार्यरत असलेल्या सतिश कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. यावेळी त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करुन दाखवण्याची शपथ घेतली होती. ही शपथ पूर्ती करुन लाखो भारतीयांचे पदकाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासापासून तो अगदी एक पाउल मागे आहे. आपल्या पुढच्या लढतीत कामगिरीत सातत्य राखून पदकाची दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्यानेच तो मैदानात उतरेल.
2010 मध्ये जिंकले होते पहिले पदक
सतिश कुमारने 2010 मध्ये उत्तर भारत एरिया चॅम्पियनशिपमध्ये पहिले गोल्ड मेडल पटकावले होते. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये रौप्य कामगिरीसह त्याने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये धमाका करण्याचा इशारा दिला. 2014 आणि 2015 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक आणि 2018 मध्ये त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत चंदेरी कामगिरी नोंदवलीये.
SL vs IND : टीम इंडियावर आलीये नेट बॉलरसह
सतिशच्या आई गुड्डी यादव यांनी एका मुलाखतीमध्ये त्याच्या अथक परिश्रमाची कहाणीही सांगितली होती. 11 वर्षांचा असल्यापासून तो बॉक्सिंगचा सराव करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आवश्य साधनसामुग्री नसल्यामुळे भोलू (सतिशला घरामध्ये या नावाने बोलवतात) ट्युबमध्ये वाळू भरुन सराव करायचा, असे त्या म्हणाल्या होत्या. लष्करातील सतिशचे सहकारी त्याला खली या नावाने हाक मारतात. आर्मी मॅन खली देशाला पदक मिळवून देण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
सतिश कुमार यादवचे प्रोफाइल
2010 कारकिर्दीच्या सुरुवातीला गोल्ड
5 राष्ट्रीय रेकॉर्ड त्याच्या नावे आहेत
2014 आशियाई क्रीडा प्रकारात कांस्य पदक
2015 आशियाई क्रीडा प्रकारात कांस्य पदक
2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक
2019 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.