पाहा तुम्हाला पटतंय का गौतम गंभीरने व्यक्त केलेलं मत
Tokyo Olympics 2020: भारतीय पुरूष हॉकी संघाने (Indian Men's Hockey Team) टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांपासून ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल (Medal) जिंकले नव्हते. पण मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पदकांचा दुष्काळ संपवला. सामन्यात सिमरनजीत सिंग (Simranjeet Singh) दोन गोल करत मोलाची भूमिका बजावली. सर्व स्तरातून भारताच्या पुरूष हॉकी संघावर कौतुकाचा (Praise all over) वर्षाव झाला. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने संघाचं केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेणारं ठरलं.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भारतीय क्रिकेटला खूप चांगल्या आठवणी दिल्या. २००७चा टी२० विश्वचषक विजय असो किंवा २०११चा वन डे विश्वचषक विजय असो, दोन्ही सामन्यात गंभीरने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, तो विजय क्रिकेटच्या विश्वचषक विजयांपेक्षाही खूप मोठा आहे, असं मत त्याने व्यक्त केले. "१९८३, २००७, २०११ चे क्रिकेट विश्वचषक विजय सोडा.... आज हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं म्हणजे सर्वात मोठा विजय आहे", अशा शब्दात त्याने हॉकी संघाचे कौतुक केले.
दरम्यान, कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीवर 5-4 असा रोमांचक विजय मिळवला. या विजयात भारतीय संघाकडून 17 आणि 34व्या मिनिटाला सिमरनजीत सिंग, 27व्या मिनिटाला हार्दिक सिंग, 29 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंग आणि 31व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंग यांनी गोल केले. महत्त्वाचा भाग म्हणजे, भारताचा गोलकिपर श्रीजेश याने प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक पेनल्टी शूट्स रोखल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.