मीराबाईने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलं रौप्यपदक
मुंबई: टोक्यो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी प्रसिद्ध वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू हिचा रेनो काइगर ही कार भेट देऊन सन्मान करण्यात आला. पूर्व इंफाळमधील एका गावातील रहिवासी असलेल्या मीराबाईने संपूर्ण देशाला गौरवान्वित केले. स्वत:ची जिद्द आणि वचनबद्धतेच्या जोरावर ती इतर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. तिचा हा प्रवास साजरा करण्यासाठी आणि तिचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मीराबाई चानू हिला स्पोर्ट्स कार काइगर देण्यात आली.
रेनो इंडियाचे उपाध्यक्ष सुधीर मल्होत्रा यांच्या हस्ते नव्या कोऱ्या रेनो काइगरच्या चाव्या रौप्य पदक विजेत्या सैखोम मीराबाई चानूकडे सुपूर्द करण्यात आल्या. मीराबाई चानू हिचा सन्मान करणे हे रेनोसाठी सन्मानाची बाब आहे, अशा भावना कंपनीने व्यक्त केल्या. रेनो काइगर या नव्या एसयुव्हीचे डिझाईन भारताचे आहे. रेनो इंडियाने भारतात आपल्या कामगिरीची दिमाखदार दहा वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या जल्लोषाचा भाग म्हणून रेनो इंडियाने रेनो काइगरचे आरएक्सटी (ओ) वेरीयंट लॉन्च केले.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव झाला. ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात तिने पहिल्याच दिवशी पदक पटवण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. कौतुकाच्या वर्षावासह तिच्यावर बक्षीसांचाही वर्षाव झाला. मणिपूर राज्य सरकारने तिला १ कोटी रुपये रोख बक्षीस दिले. तेव्हापासून बक्षीसांचा ओघ सुरूच असून आज मीराबाई चानूला कार भेट म्हणून मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.