Tokyo Paralympics 2020: टोकियोमध्ये पॅरालिंपिक (Paralympics) स्पर्धा सुरु आहे. भारताची पॅरा टेबल टेनिसपटू (table tennis) भाविना पटेलने (Bhavina Patel) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भाविनाने उपांत्यफेरीत चीनच्या (china) हँग मिओचा पराभव केला. "टोकियोमध्ये पॅरालिंपिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करु असे आपल्याला वाटले नव्हते. पण प्रत्येक सामन्यात १०० टक्के चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला" असे भाविनाने सामन्यानंतर सांगितले. भाविनाने चीनच्या टेबल टेनिसपटूचा ३-२ असा पराभव केला.
सेमीफायनलमध्ये जागा पक्की करत तिने भारताचे पहिले मेडल पक्के केले होते. महिला एकेरीतील क्लास-4 च्या क्वार्टर फायनल लढतीत तिने सर्बियाच्या राकोविचला 3-0 अशी मात दिली. भाविनाने ही लढत 11-5, 11-6, 11-7 अशी जिंकत भारताचे पदक निश्चित केले. पॅरा टेबल टेनिस क्रीडा प्रकारात पहिल्या चारमध्ये प्रवेश केल्यामुळे तिला आता किमान ब्राँज पदक मिळणार हे पक्के झाले होते. टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचे पहिले मेडल पक्के करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये.
कामगिरीतील सातत्य कायम राखत सर्वोच्च पदक मिळवण्यासाठी ती प्रयत्नशील असेल. सेमीफायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केल्यानंतर भाविनानं देशवासियांचे आभार मानले. देशवासियांची मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथेपर्यंत पोहचले आहे. सेमीफायनलमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे तिने म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.