Bhavina Patel  Twitter
क्रीडा

Paralympics : भारताला रौप्य; Sports Day ला भाविनाची चंदेरी कामगिरी

टोकियोतील पॅरालिंपिकमधील टेबल टेनिसमध्ये भारताच्या भाविना पटेलला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020 : टोकियोतील पॅरालिंपिकमधील टेबल टेनिसमध्ये भारताच्या भाविना पटेलला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सुवर्ण पदकाचे तिचे स्वप्न भंगले असून तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. टोकियो पॅरालिंपकमधील भारताचे हे पहिलेच पदक आहे. चीनच्या यींग झोऊसोबतच्या अंतिम लढतीत तिला 11-7, 11-5, 11-6 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय क्रीडा दिनी भाविनाने टोकियोत अभिमानास्पद कामगिरी नोंदवलीये.

सध्याच्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देण्याचा पराक्रमही महिला खेळाडूनेच केलाय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानुने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. विशेष म्हणजे तिनेही रौप्य पदकाची कामगिरीच केली होती. गोल्ड मेडलसाठी रंगलेल्या अंतिम लढतीत भाविनाने यिंग झाउला कडवी टक्कर दिली. पण दोनवेळा गोल्डन कामगिरी करणाऱ्या चिनी खेळाडूने अखेर बाजी मारली.

भारताची टेबल टेनिस स्टार भाविना पटेल हिने सेमीफायनलमध्ये चीनच्या मियाओ झांग हिला 3-2 असे नमवत फायनल गाठली होती. या सामन्यात तिने 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा विजय नोंदवला होता. भाविना पटेल हिने यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करुन नवा इतिहास रचला आहे. पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरलीये. क्वार्टर फायनल लढतीत भाविनाने 2016 च्या सुवर्णपदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बोरिस्लावा पेरिच रांकोविचला पराभवाचा दणका देत स्पर्धेत धमाका करण्याचे संकेत दिले होते. तिचा खेळ पाहता ती सुवर्णाला गवसणी घालेल असे वाटत होते. पण अखेर तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT