Top Controversy in Sports 2023 marathi news  
क्रीडा

Year Ender 2023 : ब्रिजभूषणवर लैंगिक शोषणाचा आरोप ते मॅथ्यूजच्या टाइम आउटपर्यंत! क्रीडा जगताला हादरवून सोडणारे मोठे वाद जे गाजले

Kiran Mahanavar

यावर्षी क्रीडाविश्वात अनेक गौरवगाथा ऐकायला मिळाल्या, परंतु अशा काही घटना घडल्या ज्यांनी क्रीडा जगताला हादरवून सोडले. यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये कोणताही खेळ असो, क्रिकेट असो, फुटबॉल असो, कबड्डी असो, हॉकी असो की कुस्ती या सर्व खेळात काही ना काही वाद झाले आहेत. आता 2023 हे वर्ष संपणार आहे. त्यामुळे या वर्षी खेळांशी संबंधित कोणते मोठे वाद झाले जे गाजले....

Wrestlers Protest

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

या वर्षांच्या सुरुवातीला सूंपर्ण जगाचे लक्ष एका मोठा वादाकडे लागले हेते. तो वाद होता ब्रिजभूषण शरण सिंग आणि भारतीय दिग्गज कुस्तीपटू. हा वाद इतका मोठा होता की त्याचे परिणाम देशातील कुस्तीच्या आखाड्यावर ही झाला.

18 जानेवारी रोजी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या दिग्गज कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन करण्यास सुरुवात केली. माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकीचा आरोप केला. आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची भेट घेत आंदोलन शांत केले.

तेव्हा क्रीडामंत्र्यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर काही महिने हे प्रकरण शांत झाले. पण पुन्हा एकदा मे महिन्यात आंदोलन पेटले. आणि कुस्तीपटू जंतरमंतरवर गेले आणि एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात ब्रिज भूषण यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. पण त्यावेळी पोलिसांनी कोणती पण एफआयआर नोंदवली नव्हती.

त्यावर कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. आणि पोलिसांनी तक्रार दाखल केलेल्या पैलवानांचे जबाब नोंदवले. त्यानंतर ब्रिजभूषण यांचा जबाब नोंदवण्यात आला. पण त्यावेळी 3 मे रोजी कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये चकमक झाली ज्यात काही आंदोलकांच्या डोक्याला दुखापत झाली.

यानंतर ब्रिजभूषण शरण सिंगला निलंबित करून त्रिसदस्यीय तदर्थ समितीने कुस्ती संघटनेचा कारभार आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर बजरंग-विनेश आणि साक्षी हरिद्वारमधील गंगेत पदके विसर्जित करण्यासाठी गेले, पण त्यांना रोखण्यात आले. काही वेळानंतर कुस्तीपटूंनी जंतरमंतर ते नवीन संसद भवनापर्यंत मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. त्यानंतर सर्व पैलवान आपापल्या कामावर परतले.

आता डिसेंबरमध्ये कुस्ती संघटनेच्या निवडणुकीचे निकाल आले आणि संजय सिंग यांची कुस्ती संघटनेच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर बजरंग, विनेश आणि साक्षी पुन्हा सक्रिय झाले. आणि साक्षीने निवृत्ती जाहीर केली तेव्हा बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत केला.

फुटबॉलमध्ये हर्मोसो-रुबियल्स स्कँडल

स्पेनच्या फिफा महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाची खेळाडू असलेल्या जेनी हर्मोसोने निलंबित स्पॅनिश सॉकर फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

वर्ल्ड कप पुरस्कार सोहळ्यादरम्यान रुबियालेसने एका महिला फुटबॉलपटूला किस घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जेनी हर्मोसोने आरोप केला होता की, स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुइस रुबियालेसने तिच्या परवानगीशिवाय तिचे चुंबन घेतले होते. यानंतर मोठा गदारोळ झाला. रुबियाल्सला चुंबन घेताना आणि इतर स्पॅनिश खेळाडूंना अयोग्यरित्या स्पर्श करताना आणि मिठी मारताना दिसले. या घटनेनेही जग हादरले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीचा अंतिम सामना ठरला वादग्रस्त

भारत आणि इराण यांच्यात 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष कबड्डीचा अंतिम सामनाही वादग्रस्त ठरला होता. अंतिम फेरीत भारत आणि इराणच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. मात्र, खेळाडू एकमेकांशी भिडले नाहीत. सामनाधिकारी आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली. हा संपूर्ण वाद रेफ्रींच्या एका निर्णयावरून झाला, जो भारताच्या विरोधात गेला. यावर भारतीय संघाने विरोध दर्शवला होता. आधी भारतीय खेळाडूंनी तर नंतर इराणच्या खेळाडूंनी मॅटवर बसून आपला निषेध व्यक्त केला.

सामनाधिकारी आपला निर्णय वारंवार बदलत राहिले. अधिक दबाव आणणाऱ्या संघाच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. 40 मिनिटांत संपणार असलेला कबड्डीचा सामना वादामुळे जवळपास तासभर थांबला होता. शेवटी निर्णय भारताच्या बाजूने लागला आणि भारतीय पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावले. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंचे चुकले. कबड्डी संघापूर्वी नीरज चोप्रा-किशोर जेना आणि ज्योती याराजी हे खेळाडूही अॅथलेटिक्समध्ये वादात सापडले होते.

अँजेलो मॅथ्यूजचा टाइम आऊटचा वाद

टाइम आऊटचा वाद केवळ वर्ल्ड कपच नाही तर संपूर्ण क्रिकेट इतिहासात लक्षात राहील. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात टाइमआउट होणारा पहिला क्रिकेटर ठरला.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या हेल्मेटमध्ये काही समस्या निर्माण झाली होती. यामुळे तो निर्धारित वेळेत मैदानात येऊन कोणाता चेंडू खेळला नाही. बांगलादेशच्या आपीलनंतर त्याला बाद घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT