Tourists dislike hotels in Paris prefer private arrangements paris olympic 2024 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : पॅरिसमधल्या हॉटेल्सना पर्यटकांची नापसंती

ऑलिंपिकच्या काळात जवळपास दीड कोटी पर्यटक पॅरिसला भेट देणार, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला होता आणि त्यानुसारच इतक्या पर्यटकांना राहता येईल, अशा सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर होता तो हॉटेल व्यवसाय.

सकाळ वृत्तसेवा

- रोहिणी गोसावी

ऑलिंपिकच्या काळात जवळपास दीड कोटी पर्यटक पॅरिसला भेट देणार, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला होता आणि त्यानुसारच इतक्या पर्यटकांना राहता येईल, अशा सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर होता तो हॉटेल व्यवसाय.

पॅरिसमध्ये एवढ्या पर्यटकांना सामावून घेण्यासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी त्याच्या हॉटेल्सच्या शाखा परिसराच्या वेगवेगळ्या भागात सुरू केल्या होत्या; पण ऑलिंपिक सुरू होऊन आठवडा होत आला तरीही हॉटेल व्यावसायिकांना मात्र त्यांच्या अंदाजानुसार पर्यटकांचे बुकिंग्स मिळाले नाही. एरव्ही पॅरिसच्या उन्हाळी हंगामामध्ये होते तितके बुकिंगही सध्या हॉटेल्समध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे ऑलिंपिकमध्ये सगळ्यात जास्त नफा कमावणारा व्यवसाय म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं त्याच व्यवसायाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

हॉटेल्सऐवजी पर्यटकांनी खासगी व्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. कारण Air B&B सारख्या खासगी प्लॅटफॉर्मवर घरं उपलब्ध नाहीयेत. याचसारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तसंच काही नागरिकांनी स्वत:च्या ओळखीवरही घरातच काही पर्यटकांना जागा दिली. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसतोय.

प्रचंड दरवाढ

ऑलिंपिकची घोषणा झाल्यानंतर गेले काही महिने पॅरिसमध्ये काय काय महागणार, यावर बरीच चर्चा झाली होती. त्यातच हॉटेल्सचे दर प्रचंड वाढणार, अशीही चर्चा होती. त्यातच हॉटेल बुक केल्यानंतर त्यावर जो टॅक्स भरावा लागणार होता,

त्यात जवळपास दोन पटीनं वाढ करण्यात आली होती, म्हणजे जर एखाद्या हॉटेलचा दर एरव्ही १०० युरो एका दिवसासाठी लागणार असतील तर ऑलिंपिकसाठी तोच दर टॅक्स पकडून ३०० युरोवर गेला होता. तुलनेत खासगी घरांच्या किमती जैसे थे होत्या. त्यात फार दरवाढ झाली नव्हती.

छोट्या खोल्या

पॅरिसमध्ये हॉटेलच्या खोल्या एकदम लहान आहेत, एक किंवा दोन जणांसाठीही खोल्या लहान होत्या, त्यामुळे कुटुंबासह पॅरिसला आलेल्या पर्यटकांसाठी हॉटेलचा पर्याय जास्त खर्चिक झालाय. त्याउलट खासगी घरांमध्ये मोठ्या खोल्या किंवा संपूर्ण घर कमी दरानं उपलब्ध होतं, त्यामुळं तो पर्याय मोठ्या कुटुंबांसाठी सोयीचा आणि कमी खर्चिक आहे.

जेवणाची व्यवस्था

अनेक कुटुंबे ही ऑलिंपिकसाठी जास्त दिवस राहण्याच्या हेतूने पॅरिसमध्ये आली आहेत आणि अनेक फ्रेंच खाण्यापेक्षा आपापल्या देशातलं खाणं पसंत करतात. त्यातही हॉटेलमध्ये खाण्याचे वेगळे पैसे भरावे लागतात, तर खासगी घरांमध्ये जेवण बनवण्याची सोय असल्यानं हवं ते हवं तेव्हा बनवता येतं आणि लहान मुलांच्या कुटुंबालाही ते सोयीचं होतं.

ऑलिंपिकमुळं पॅरिस शहर आधीच महाग झालंय. सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढल्यात. त्यामुळे शक्य होईल तेथे खर्च कमी करण्यावर पर्यटकांचा भर आहे. म्हणूनच वर उल्लेखलेल्या अनेक कारणांनी जगभरातल्या पर्यटकांनी हॉटेलऐवजी खासगी घरांना प्राधान्य दिल्याचं चित्र पॅरिसमध्ये पाहायला मिळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT