U19 World Cup 2024 Final esakal
क्रीडा

U19 World Cup 2024 Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप फायनलमध्ये हरवण्याची संधी, कधी अन् कुठं पाहायचा Live सामना?

U19 World Cup 2024 Final : रोहितचा बदला उदय घेणार; भारत विक्रमी सहाव्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियासोबत भिडणार

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup 2024 Final IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत रोहित सेनेच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. आता 19 वर्षाखालील भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.

भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये भारताने विजतेपद पटकावले होते. आता रेकॉर्ड ब्रेक सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी उदय सहारणच्या नेतृत्वाखालील संघाला असणार आहे.

याचबरोबर अहमदाबादमधील भारताच्या पराभवाची परतफेड करण्याचीही संधी आहे. हा असा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हाय व्होल्टेज वर्ल्डकप फायनल सामना कधी अन् कुठं होणार आहे. तो लाईव्ह कुठं पाहायचा हे जाणून घेऊयात.

भारत - ऑस्ट्रेलिया सामना कधी होणार आहे?

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना हा रविवारी 11 फेब्रवारीला होणार आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कधी सुरू होईल?

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 ला सुरू होणार आहे. नाणेफेक 1.00 वाजता होईल.

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 अंतिम सामना कोठे होणार आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया हा हाय व्होल्टेज फायनल सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

फायनल कोणत्या टीव्ही चॅनलवरून थेट प्रसारित होणार आहे?

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 ची फायनल ही स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होईल.

सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहावयास मिळेल?

भारत - ऑस्ट्रेलियाचा सामना हा हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT