UAE vs New Zealand 2nd T20 
क्रीडा

UAE vs NZ 2nd T20: न्यूझीलंडला हरवून UAE ने रचला इतिहास! किवी संघाच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Kiran Mahanavar

UAE vs New Zealand 2nd T20 : गेल्या आठवड्यातच वेस्ट इंडिजने टी-20 मालिकेत भारताचा 3-2 असा पराभव करून दहशत निर्माण केली होती. आता क्रिकेट विश्वात एक मोठा चमत्कार घडला आहे. संयुक्त अरब अमिरातीने टी-20 सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.

फिरकीपटू अयान अफझल खानच्या घातक स्पेलच्या जोरावर यूएईने न्यूझीलंडला अवघ्या 142 धावांवर रोखले आणि त्यानंतर कर्णधार मोहम्मद वसीमच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने अवघ्या 16 षटकांत हे लक्ष्य गाठले. यासह यूएईने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या पराभवासोबत न्यूझीलंडच्या नावावरही एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये एसोसिएट टीमकडून पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी किवी संघ त्यांच्या क्रिकेटच्या इतिहासात कधीही एसोसिएट टीमकडून हरला नव्हता. तसेच आता सर्व 12 कसोटी खेळणारे संघ किमान एकदा तरी एसोसिएट टीमविरुद्ध हरले आहेत.

कसोटी खेळणाऱ्या देशाच्या एसोसिएट टीमविरुद्ध पहिला पराभव (ODI/T20)

  • भारत विरुद्ध श्रीलंका, 1979

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे, 1983

  • इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे, 1992

  • वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया, 1996

  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, 1999

  • बांगलादेश विरुद्ध कॅनडा, 2003

  • श्रीलंका- वि केनिया, 2003

  • झिम्बाब्वे - वि केनिया, 2003

  • अफगाणिस्तान वि स्कॉटलंड 2018

  • आयर्लंड वि नेदरलँड्स 1018

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स 2022

  • न्यूझीलंड - वि UAE 2023

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात नाणेफेक जिंकून UAE ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मार्क चॅपमनच्या (63) अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 142 धावांपर्यंत मजल मारली. चॅपमन व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. यजमानांकडून अयान खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात आर्यांश शर्मा खाते न उघडता टीम साऊथीचा बळी ठरला. मात्र यानंतर कर्णधार मोहम्मद वसीमने वृत्ती अरविंद आणि आसिफ खानसोबत छोट्या भागीदारी करत संघाला धावसंख्येच्या जवळ आणले. 29 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा करत वसीम सँटनरचा बळी ठरला. तो बाद झाल्यानंतर आसिफ खानच्या 48 धावांच्या नाबाद खेळीने संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT