UEFA Euro 2020 Denmark vs Finland : युरो चषकातील तिसऱ्या सामन्यात धक्कादायक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. कोपनहेगनच्या पार्केन स्टेडियमवर डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यातील सामना रंगला होता. हा सामना सुरु असताना डेन्मार्कचा स्टार मिडफिल्डर क्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानात कोसळला. या घटनेनंतर रेफ्रींनी मेडिकल इमर्जन्सीमुळे सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एरिक्सन कोसळल्यानंतर सहकाऱ्यांना त्याला घेराव घातला. त्यानंतर स्टेचरवरुन त्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. (christian-eriksen-collapses-during-denmark-vs-finland-match-uefa-suspended)
एरिक्सन मैदानात कोसळला त्यावेळी त्याच्या आजूबाजूला कोणताही खेळाडू नव्हता. अचानकपणे मैदानात घडलेल्या प्रकारानंतर मॅच रेफ्री अँथनी टेलर यांनी तात्काळ शिटी वाजवत सामना थांबवण्याचा इशारा दिला. या घटनेनंतर मैदानात एकच शांतता पसरली. एरिक्सनची पत्नी घाबरुन मैदानात पळत आली. डेन्मार्कचा गोलकीपर कॅस्पर स्मायकल आणि कर्णधाराने एरिक्सनच्या पत्नीला धीर देण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रकारानंतर स्थगित करण्यात आलेला सामना स्थानिक वेळेनुसार 8.30 ला पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा UEFA ने अधिकृतरित्या केलीये. दोन्ही संघातील खेळाडूंनी याला सहमती दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पहिल्या हाफमधील 4 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक आणि त्यानंतर दुसऱ्या हाफमधील खेळ होणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.