Finland vs Russia  Twitter
क्रीडा

Euro: विजयी सलामी देणाऱ्या फिनलंडला नमवत रशियाने उघडले खाते

सलामीच्या सामन्यात रशियाला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 Finland vs Russia : युरो कप स्पर्धेतील ग्रुप B मध्ये असलेल्या रशियाने दुसऱ्या सामन्यात स्पर्धेतील पहिला वहिला विजय नोंदवला. फिनलंड विरुद्धच्या सामन्यात अलेक्से मिरॅन्चुकने केलेल्या गोलच्या जोरावर रशियाने 1-0 असा विजय नोंदवत आपल्या ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवले. सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूने कमालीचा खेळ केला. सर्वाधिक 59 टक्के गोल पजेशन (बॉलवरील नियंत्रण) ठेवणाऱ्या रशियाला अलेक्से मिरॅन्चुक याने आघाडी मिळवून दिली. त्याने आर्टेम दिझ्युबाच्या पासवर 46 व्या मिनिटाला गोल डागत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. फिनलंडच्या संघाने ही आघाडी भेदण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही.

फिनलंडने आपल्या सलामीच्या सामन्यात डेन्मार्कला 1-0 अशी मात दिली होती. या विजयासह त्यांनी स्पर्धेत तीन गुणांची कमाई केली. दुसरीकडे रशियाला सलामीच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. बेल्जीयमने त्यांना 3-0 असे नमवले होते. वर्ल्ड नंबर वन असलेला बेल्जियमचा संघ या गटातील सर्वात मजबूत दावेदार आहे. पहिल्यांदाच युरो कप स्पर्धा खेळणाऱ्या फिनलंड संघाचा रशिया विरुद्धचा रेकॉर्ड निराशजनकच राहिला आहे.

फिनलंडचा संघ 109 वर्षांपासून रशियाला रोखू शकलेला नाही. 1912 मध्ये ऑलिम्पिक गेम्समध्ये फिनलंडने रशियाला पराभूत केले होते. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही झालेल्या चार सामन्यात रशियाने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. सलामीच्या सामन्यात फिनलंड आणि डेन्मार्क यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात ख्रिस्टियान एरिक्सन मैदानात बेशुद्ध झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सामना काही काळासाठी स्थगित झाला. त्यानंतर रंगलेल्या सामन्यात फिनलंडने एरिक्सनच्या अनुपस्थितीचा फायदा घेत 1-0 अशी बाजी मारत विजयी सलामी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT