France vs Switzerland  Twitter
क्रीडा

स्वित्झर्लंडची 'क्रांती'; वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स पेनल्टी शूटमध्ये 'आउट'

सुशांत जाधव

UEFA EURO 2020 : पेनल्टी शूट आउट पर्यंत पोहचलेल्या रंगतदार सामन्यात स्वित्झर्लंडने क्रांती घडवली. वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला नमवून स्वित्झर्लंडचा संघ 67 वर्षानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये पोहचलाय. पेनल्टी शूटआउटमध्ये स्वित्झर्लंडने एकही शॉट मिस केला नाही. पहिली किक स्वित्झर्लंडकडून मारण्यात आली. तर फ्रान्सकडून शेवटची आणि अयशस्वी किक ही कायलेन एम्बापेच्या वाट्याला आली. पेनल्टी शूट आउटमध्ये 5-4 असा स्कोअर असताना फ्रान्सने आपला हुकमी एक्का बाहेर काढला. कायलेन एम्बापेची (Kylian Mbappé) पेनल्टी किक हुकली आणि फ्रान्सचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. स्वित्झर्लंड गोलकिपर यान सोमर (Yann Sommer) याने एम्बापेचा शॉट रोखून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या जोरावरच स्वित्झर्लंडने 3-3 अशा बरोबरीत एक्स्ट्रा टाईमध्ये नेलेला सामना पेनल्टी शूट आउटमध्ये आपल्या नावे करत क्वार्टर फायनलचे तिकीट मिळवले. (UEFA EURO 2020 France vs Switzerland Round of 16 Scores at 3-3 after extra time Switzerland Create History in PENALTY SHOOTOUT)

वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात स्वित्झर्लंडने कमालीचा खेळ दाखवला. नॉक आउट राऊंडमधील सलग दुसरा रंगतदार सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या हाफमध्ये हॅरिस सेफरोविचने 15 व्या मिनिटाला स्वित्झर्लंड संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी स्वित्झर्लंडच्या संघाने पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत कामय ठेवली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये करीम बेंझमाने अवघ्या दोन मिनिटात दोन गोल डागत फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने 57 आणि 59 व्या मिनिटात हे दोन गोल डागले. 75 व्या मिनिटाला पॉल पोगबाने यात आणखी एका गोलची भर घातल संघाला 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

संघाचे खाते उघडणाऱ्या हॅरिस सेफरोविचने 81 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. निर्धारित वेळेतील अखेरच्या म्हणजेच 90 व्या मिनिटाला मारिओ गॅव्हरानोविचने अप्रतिम गोल डागत सामना 3-3 बरोबरीसह एक्ट्रा टाईमध्ये नेला. त्यानंतर 15- 15 मिनिटांच्या दोन हाफमधील खेळानंतर सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये गेला. युरोतील पहिला सामना पेनल्टी शूट आउटमध्ये गेला आणि यात स्वित्झर्लंडने बाजी मारली.

यापूर्वी स्वित्झर्लंडच्या संघाला 2006 च्या वर्ल्डकपमध्ये युक्रेन विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 2016 च्या युरोमध्ये त्यांना पोलंडकडून पेनल्टी शूट आउटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला नमवत त्यांनी हा रेकॉर्ड सुधारला आहे. दुसरीकडे सातव्यांदा पेनल्टी शूट आउट खेळणाऱ्या फ्रान्सच्या नावे आता 4-3 असा स्कोअर नोंद झालाय.

पेनल्टी शूट आउट!

स्वित्झर्लंड 1-0 फ्रान्स : मारिओ गॅव्ह्रानोविच... गोल!

स्वित्झर्लंड 1-1 फ्रान्स: पॉल पोगबा... गोल !

स्वित्झर्लंड 2-1 फ्रान्स: फेबियन शार... गोल!

स्वित्झर्लंड 2-2 फ्रान्स: ओलिवियर गिरौद... गोल!

स्वित्झर्लंड 3-2 फ्रान्स: मॅनुअल आकांजी... गोल!

स्वित्झर्लंड 3-3 फ्रान्स: मार्कस थूरम...गोल!

स्वित्झर्लंड 4-3 फ्रान्स: रुबेन वर्गास.. गोल!

स्वित्झर्लंड 4-4 फ्रान्स: प्रिन्सेल किम्पेम्बे... गोल!

स्वित्झर्लंड 5-4 फ्रान्स: अदमीर मेहमेदी... गोल!

स्वित्झर्लंड 5-4 फ्रान्स: कायलेन एम्बापे...मिस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT