UEFA Euro 2024 Schedule : युरो कप 2024 ची सुरूवात 15 जूनपासून होत आहे. यंदाचा युरो कप हा जर्मनीमध्ये होणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना हा यजमान जर्मनी आणि स्कॉटलँड यांच्यात 15 जूनला होणार आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे भारतात रात्री उशिरा होणार असल्याने फुटबॉल चाहत्यांना जागरणाची तयारी करावी लागणार आहे.
जर्मनीत 2007 फिफा वर्ल्डकप झाला होता. त्यानंतर जर्मनीने एकही मोठी स्पर्धा होस्ट केली नव्हती. गतवेळेची युरो कप चॅम्पियन इटली यंदा मात्र ग्रुप ऑफ डेथमध्ये आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये स्पेन आणि क्रोएशिया हे तगडे संघ आहे. इटली आपला पहिला सामना 16 जूनला अल्बानियासोबत खेळणार आहे. फ्रान्सचा स्टार किलियन एम्बाप्पे 18 जूनला आपला पहिला सामना खेळणार आहे. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा 19 जूनला खेळताना दिसेल.
यंदाच्या युरो कपच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे सोनी टीव्हीवरून होणार आहे. तर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोनी लिव्हवर होणार आहे. स्पर्धेची बाद फेरी ही 29 जून पासून सुरू होईल तर फायनल ही 15 जुलैला होणार आहे.
गट अ
15 जून 2024: जर्मनी विरुद्ध स्कॉटलंड, म्युनिक [12:30 AM]
15 जून 2024: हंगेरी विरुद्ध स्वित्झर्लंड, कोलोन [PM 6:30 IST]
19 जून 2024: जर्मनी विरुद्ध हंगेरी, स्टटगार्ट [9:30 PM IST]
20 जून 2024: स्कॉटलंड विरुद्ध स्वित्झर्लंड, कोलोन [12:30 AM IST]
24 जून 2024: स्वित्झर्लंड विरुद्ध जर्मनी, फ्रँकफर्ट [12:30 AM IST]
24 जून 2024: स्कॉटलंड विरुद्ध हंगेरी, स्टटगार्ट [12:30 AM IST]
गट ब
15 जून 2024: स्पेन विरुद्ध क्रोएशिया, बर्लिन [9:30 PM IST]
16 जून 2024: इटली विरुद्ध अल्बेनिया, डॉर्टमंड [12:30 AM IST]
19 जून 2024: क्रोएशिया विरुद्ध अल्बेनिया, हॅम्बर्ग [6:30 PM IST]
21 जून 2024: स्पेन विरुद्ध इटली, गेल्सेनकिर्चेन [12:30 AM IST]
25 जून 2024: अल्बानिया विरुद्ध स्पेन, डसेलडॉर्फ [12:30 AM IST]
25 जून 2024: क्रोएशिया विरुद्ध इटली, लीपझिग [12:30 AM IST]
गट क
16 जून 2024: स्लोव्हेनिया विरुद्ध डेन्मार्क, स्टटगार्ट [9:30 PM IST]
17 जून 2024: सर्बिया विरुद्ध इंग्लंड, गेल्सेनकिर्चेन [12:30 AM IST]
20 जून 2024: स्लोव्हेनिया विरुद्ध सर्बिया, म्युनिक [6:30 PM IST]
20 जून 2024: डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड, फ्रँकफर्ट [9:30 PM IST]
26 जून 2024: डेन्मार्क विरुद्ध सर्बिया, म्युनिक [12:30 AM IST]
26 जून 2024: इंग्लंड विरुद्ध स्लोव्हेनिया, कोलोन [12:30 AM IST]
गट ड
16 जून 2024: पोलंड विरुद्ध नेदरलँड, हॅम्बर्ग [6:30 PM IST]
18 जून 2024: ऑस्ट्रिया विरुद्ध फ्रान्स, डसेलडॉर्फ [12:30 AM IST]
21 जून 2024: पोलंड विरुद्ध ऑस्ट्रिया, बर्लिन [9:30 PM IST]
22 जून 2024: नेदरलँड विरुद्ध फ्रान्स, लीपझिग [12:30 AM IST]
25 जून 2024: फ्रान्स विरुद्ध पोलंड, डॉर्टमंड [9:30 PM IST]
25 जून 2024: नेदरलँड विरुद्ध ऑस्ट्रिया, बर्लिन [PM 9:30 IST]
गट ई
17 जून 2024: रोमानिया विरुद्ध युक्रेन, म्युनिक [6:30 PM IST]
17 जून 2024: बेल्जियम विरुद्ध स्लोव्हाकिया, फ्रँकफर्ट [9:30 PM IST]
21 जून 2024: स्लोव्हाकिया विरुद्ध युक्रेन, ड्युसेलडॉर्फ [6:30 PM IST]
23 जून 2024: बेल्जियम विरुद्ध रोमानिया, कोलोन [12:30 AM IST]
26 जून 2024: स्लोव्हाकिया विरुद्ध रोमानिया, फ्रँकफर्ट [PM 9:30 IST]
26 जून 2024: युक्रेन विरुद्ध बेल्जियम, स्टटगार्ट [9:30 PM IST]
गट एफ
18 जून 2024: तुर्की विरुद्ध जॉर्जिया, डॉर्टमंड [PM 9:30 IST]
19 जून 2024: पोर्तुगाल विरुद्ध झेक प्रजासत्ताक, लीपझिग [12:30 AM IST]
22 जून 2024: जॉर्जिया विरुद्ध झेक प्रजासत्ताक, हॅम्बर्ग [6:30 PM IST]
22 जून 2024: तुर्की विरुद्ध पोर्तुगाल, डॉर्टमुंड [PM 9:30 IST]
27 जून 2024: जॉर्जिया विरुद्ध पोर्तुगाल, गेल्सेनकिर्चेन [12:30 AM IST]
27 जून 2024: झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, हॅम्बर्ग [12:30 AM IST]
29 जून ते 3 जुलै : राऊंड ऑफ 16
5 जून ते 7 जुलै : उपांत्यपूर्व फेरी
10 जुलै ते 11 जुलै : उपांत्य फेरी
15 जुलै : अंतिम सामना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.