Euro 2024, Spain vs Italy: युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (21 जून) स्पेन आणि इटली संघात सामना झाला. या सामन्यात स्पेनने 1-0 अशा गोल फरकाने विजय मिळवत अंतिम 16 संघात स्थान पक्के केले आहे.
या स्पर्धेत इटली आणि स्पेन यांचा बी ग्रुपमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये आता या विजयासह तीन वेळच्या विजत्या स्पेनने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात इटलीला रिकार्डो कालाफिओरीनेकडून झालेल्या स्वंय गोलचा फटका बसला. हा एकमेव गोल या सामन्यात पाहायला मिळाला. रिकार्डोकडून दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या 55 व्या मिनिटाला गोल झाला. दरम्यान, दोन्ही संघांनी संपूर्ण सामन्यात एकमेकांना तगडी लढत दिली होती.
या सामन्यात स्पेनने सुरुवातीलाच आक्रमण केले होते. मात्र, त्यांना पहिल्या हाफमध्ये गोल करण्यापासून रोखण्यात इटलीला यश आले. इटलीने अनेकदा स्पेनची लय तोडण्याचा देखील यादरम्यान प्रयत्न केला.
पहिल्या हाफमध्ये निको विलियम्सला गोलची चांगली संधी मिळाली होती. मात्र अगदी काही इंचाच्या अंतराने त्याची ही संधी हुकली. दरम्यान, पहिला हाफ 0-0 अशा बरोबरीत संपला.
दुसऱ्या हाफचीही सुरुवात झाल्यानंतर 55 व्या मिनिटालाच निको विलियम्सच्या क्रॉसवर बॉल रिकार्डोला लागून नेटमध्ये गेला. त्यामुळे स्पेनच्या खात्यात गोल आल्याने त्यांनी आघाडी घेतली. यानंतर इटलीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात अपयश आले.
आता 25 जूनला स्पेनल अल्बानियाविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर इटलीला क्रोएशियाविरुद्ध सामना खेळायचा आहे. बी ग्रुपमधून पुढच्या फेरीत जाण्यासाठी इटलीला पराभव टाळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यांनी जर या सामन्यात पराभव टाळला, तर ते स्पेननंतर या ग्रुपमधून अंतिम 16 संघात स्थान मिळवू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.