Under 19 world cup cricket selected for siddharth yadav SAKAL
क्रीडा

Under 19 : किराणा दुकानदाराचा मुलगा सिद्धार्थने केले वडिलांचे स्वप्न साकार

Kiran Mahanavar

Under 19 world cup : भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारे अनेक खेळाडू हे तळागाळातून वर आलेले आहेत. भारताच्या 19 वर्षाखालील संघाकडून खेळलेले किंवा खेळणारे अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी कष्टातून आपली कारकिर्द घडवली. असाच एक कष्टातून वर आलेला सर्वसाधारण घरातील खेळाडू म्हणजे सिद्धार्थ यादव (siddharth yadav). सिद्धार्थचे वडील हे गाझियाबादमध्ये किराणा स्टोअर चालवतात. त्यांच्या वडिलांनी आपले अधुरे स्वप्न आपल्या मुलात सिद्धार्थ यादवमध्ये पाहिले आणि मुलाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले.

भारतीय अंडर-19 (Under-19) संघात निवड झालेल्या सिद्धार्थ यादवच्या वडील देखील क्रिकेटवेडे होते. त्यांनाही मोठा क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती. मात्र त्यांचे क्रिकेट भारताचे माजी खेळाडू मनोज प्रभार यांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यापर्यंतच मर्यादित राहिले. त्यांनी आपल्या स्वप्नांना तिलांजली देत उदरनिर्वाहासाठी किराणा सोअर सुरु केले. मात्र त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलाने सिद्धार्थने पूर्ण करुन दाखवले. सिद्धार्थ यादवची भारताच्या 19 वर्षाखालील संघात निवड झाली आहे.

सिद्धार्थच्या निवडीनंतर किराणा स्टोअर आले चर्चेत

गाझियाबादचा सिद्धार्थ यादवला भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळविले. सिद्धार्थचे वडील श्रावण यादव यांचे गाझियाबादमध्ये किराणा दुकान असून मुलाच्या संघात निवड झाल्यापासून त्यांचे दुकान अधिक चर्चेत आहे. दुकानात येणारे ग्राहक त्यांचे अभिनंदन करत आहे.

सिद्धार्थ यादवचे वडील श्रावण यादव फक्त दुकानदार नव्हते. तर गाझियाबादमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना नेट मध्ये गोलंदाजी करत होते. त्यांचे मोठा क्रिकेट खेळाडू होण्याचे स्वप्न नेटमध्ये गोलंदाजी करण्यापुरते मर्यादित राहिले होते. पण त्यांची खेळाची आवड अमर्याद असल्यामुळे त्यांचे स्वप्न मुलाने सिद्धार्थ यादव पूर्ण करायचं ठरवलं.

दुपारी दुकान बंद करून सिद्धार्थ मैदानात

सिद्धार्थने आपल्या वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मेहनत घेत होता. प्रत्येक दिवशी दुपारी श्रवण आपले दुकान बंद करून सिद्धार्थला जवळच्या मैदानावर घेऊन जायचे. दुपारी दोन वाजता दुकान बंद केले की संध्याकाळी सहा वाजता मैदानावरून देऊन दुकान उघडत आसत.

सिद्धार्थ वडिलांनी सांगितले की सिद्धार्थच्या क्रिकेटवेडाला घरातून इतर कोणाचा पाठिंबा नव्हता. त्याच्या आजीला असं वाटत होतं त्याने अभ्यासावर लक्ष द्यावे. आजीला असं वाटायचं की हा एक जुगार आहे. आयुष्य खराब होईल. मुलगा वाया जाईल. पण सिद्धार्थला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते.

भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा गेला हंगाम कोरोनामुळे वाया गेला होता. बीसीसीआयला वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपसाठी संघाची निवड करायची होती. त्यामुळे त्यांनी 19 वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीचे आयोजन केले. या स्पर्धेत सिद्धार्थ यादवने धावांचा पाऊस पाडला. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली. सिद्धार्थ यादव बांगलादेश आणि दोन भारतीय संघ यांच्यात खेळवल्या गेलेल्या ट्राय सिरीजसाठी निवडला गेला. या मालिकेत त्याने 3 सामने खेळले आणि त्यातील एका सामन्यात 43 धावांची नाबाद खेळी केली.

सिद्धार्थ हा एक साधा मुलगा आहे. तो मित्रांबरोबर फारशी भटकंती करत नाही. त्याला महागड्या गॅजेटचीही क्रेज नाही. तो मित्रांबरोबर चित्रपट पाहण्यासही फारसा जात नाही. तो म्हणतो 'आर्थिक चणचण कायमच जाणवायची. पण मी कधीही याची तक्रार कुटुंबाकडे केली नाही. माझे मित्र चित्रपट बघायला जायचे, शॉपिंगला जायचे मी त्यांच्याबरोबर कधीही गेलो नाही. मी भटकंती करत कोणताही वायफळ खर्च करत नव्हतो.' भारताच्या 19 वर्षाखालील संघात निवड होणे ही सिद्धार्थसाठी फक्त एक सुरुवात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT