Unmukt-Chand 
क्रीडा

संधी न मिळाल्याने २८व्या वर्षी खेळाडूचा भारतीय क्रिकेटला रामराम

२८व्या वर्षी भारतीय क्रिकेटला अलविदा; दुसऱ्या देशाकडून गाजवणार मैदान कर्णधार म्हणून भारताला जिंकवून दिला होता अंडर-१९ वर्ल्डकप Unmukt Chand retires from Indian cricket at the age of 28 seeks new opportunity in USA Cricket team vjb 91

विराज भागवत

कर्णधार म्हणून भारताला जिंकवून दिला होता अंडर-१९ वर्ल्डकप

भारताला २०१२चा अंडर-19 विश्वचषक जिंकवून देणारा धडाकेबाज फलंदाज उन्मुक्त चंद याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०१२च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने विश्वविजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. पण भारताच्या ज्येष्ठ संघात त्याला संधी न मिळाल्यामुळे अखेर वयाच्या २८व्या वर्षी त्याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने ही माहिती दिली. मी BCCI ला निरोप देण्याचा आणि नव्या चांगल्या संधीच्या शोधासाठी हा निर्णय घेतला आहे, असे त्याने सांगितले. उन्मुक्त चंद अमेरिकेच्या संघाकडून क्रिकेट खेळणार असल्याची चर्चा आहे.

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उन्मुक्त चंद याने दमदार १११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो ज्येष्ठ संघात स्थान मिळवेल आणि नक्कीच देशाचे नाव उंचावेल असे बोलले जात होते. पण त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. त्याला देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्येही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अखेर त्याने हा निर्णय घेतला.

"मला कळत नाहीये की मी नक्की कशाप्रकारच्या भावना व्यक्त करायला हव्यात. प्रामाणिकपणे बोलायचं तर मी अजूनही या सर्व संधीच्या शोधातच आहे. ज्या देशासाठी खेळायचं स्वप्न मी पाहिलं त्या देशाचे प्रतिनिधित्व मी पुन्हा करू शकणार नाही, हा विचारच हृदयाचे ठोके चुकवणारा आहे. भारतातील माझ्या क्रिकेट प्रवासात मी काही गौरवशाली क्षण अनुभवले", अशा शब्दात चंद याने भावना व्यक्त केल्या.

भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. एक कर्णधार म्हणून विश्वकरंडक उंचावणे आणि देशात आणणे ही एक खास अशी भावना होती. जगभरातील अनेक भारतीयांना तो क्षण आनंदी करून जातो. मी ही भावना कधीच विसरू शकत नाही. तसेच, भारत A संघाकडून मी अनेक मालिका खेळलो. त्यातही मला खूप काही शिकता आले याचा मला अभिमान आहे", अशी भावनिक पोस्ट त्याने आपल्या ट्विटरवर लिहीली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT