US Open 2022 Nick Kyrgios  esakal
क्रीडा

US Open Video : किती हा राग! पराभवानंतर निक कर्गिओसची कोर्टवरच आदळ-आपट

अनिरुद्ध संकपाळ

US Open 2022 Nick Kyrgios : ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि तितकाच वादग्रस्त टेनिसपटू निक कर्गिओसने पुन्हा एकदा वादग्रस्त वर्तन केले. युएस ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या कारेन खाचनोव्हने कर्गिओसचा पाच सेटमध्ये पराभव केला. या पराभवानंतर राग नियंत्रण न राहिलेल्या निक कर्गिओसने आपल्या दोन्ही टेनिस रॅकेट कोर्टवर आपटत तोडून टाकल्या.

युएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या खाचोनोव्हने कर्गिओसवर 7-5, 4-6, 7-5, 6-7(3-7), 6-4 असा पराभव केला. यंदाच्या विंम्बल्डनचा उपविजेता कर्गिओस युएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला. यानंतर कर्गिओसने प्रतिक्रिया दिली की, 'मी खूप निराश झालो आहे. मात्र विजयाचे श्रेय कारेनला जाते तो एक लढवय्या आहे. मात्र माझा पराभव हा उद्ध्वस्त करणारा आहे. यामुळे खूप वेदना झाल्या. फक्त माझीच नाही तर ज्यांना मी विजयी व्हावे असे वाटते होते त्यांची निराशा झाली.'

निक कर्गिओस पुढे म्हणाला की, 'मी या स्पर्धेत निराशा केली अशी माझी भावना होती. खरं सांगायचं तर मी इतर कोणत्याही स्पर्धेची इकती काळजी करत नाही. मला ग्रँडस्लॅममध्ये खेळायला आवडते. आता ग्रँडस्लॅममध्ये यश मिळत आहे त्यामुळे इतर स्पर्धा माझ्यासाठी फारशी महत्वाची नाही.'

निक कर्गिओस यंदाच्या विंम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्याला नोव्हाक जोकोविचने चार सेटमध्ये पराभूत केले होते. जोकोविचने आपले 21 वे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT