Sports Streaming App : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील क्रीडा क्षेत्रातील तीन दिग्गज माध्यम कंपन्या वॉल्ट डिज्नेची इएसपीएन, फोक्स कॉर्प आणि वॉर्नर ब्रदर्सचे डिस्कव्हरी हे तिघे मिळूण एक स्पोर्ट्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत. या तिघांकडे फिफा वर्ल्डकप, फॉर्म्युला वन, एनएफएल, एनबीए आणि मेजर लीग बेसबॉल या जगतील मोठ्या स्पर्धांचे प्रसारण हक्क आहेत.
क्रीडा जगतातील तीन मोठ्या कंपन्या या तरूणांना आकर्षिक करण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत. हा नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नव्या ब्रँड आणि स्वतंत्र व्यवस्थापन टीम सोबत बाजारात लाँच केला जाईल. हा प्लॅटफॉर्म मुख्यत्वे अॅपद्वारे लाँच केला जाईल.
या अॅपचे स्बस्क्रिप्शन कसे असेल याबाबत अजून कोणती घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच याबाबतची घो,णा होणार असल्याचे अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. या कंपन्यांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक कंपनीचा या नव्या प्रॉजेक्टमध्ये मालकी हक्क हा एक तृतीयांश असणार आहे. त्याचबरोबर बोर्डावर समसमान प्रतिनिधित्व असणार आहे.
या कंपन्यांनी एकत्रित स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपचा निर्णय घेतला कारण स्पोर्ट्स लीग या प्रक्षेपण हक्काच्या लिलावावेळी खूप जास्त पैसे आकारत आहेत. त्यामुळे फक्त टेलिकास्ट करणाऱ्या कंपन्यांची फी ही अनेक मिडीया डिस्ट्रिब्युटरमध्ये विभागली जात होती.
डिज्ने, इएसपीएन यांनी एकत्रित दिलेल्या वक्तव्यामध्ये सांगितले की, क्रीडा चाहत्यांना विशेषकरून पारंपरिक पद्धतीचे टीव्ही चॅनल्स पाहत नाहीत अशांना सेवा पुरवणे हा या अॅपचा उद्येश असेल.
याबाबत बोलचाना वॉल्ट डिज्नेचे सीईओ बॉब इगर यांनी सांगितले की, 'क्रीडा चाहत्यांसाठी ही मोठी खूषखबर आहे. याचबरोबर माध्यम व्यवसायासाठी देखील एक मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे.
फॉक्सचे सर्वेसर्वा लॅचनल मरडॉक हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'आता सगळा स्पोर्ट्स कंटेट हा एकाच ठिकाणी मिळणार आहे.
नेटफ्लिक्स, अमेझॉन, अॅप्पल टीव्ही या जगभरातील प्रसिद्ध स्ट्रिमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षात आपला विस्तार चांगल्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे पारंपरिक माध्यम कंपन्यांना या क्षेत्रात त्वरित गुंतवणूक करणे आणि स्पर्धा करणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.