क्रिकेट टीम इंडियाचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली(Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याची निराशजनक कामगिरी पाहता क्रिकेट जगतातून अनेक दिग्गज त्याला सल्ले देताना दिसत आहेत. अशातच इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराटला खास सल्ला दिला आहे. अनेकांनी विराटला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला मात्र, वॉनने त्याला 10 वर्षापूर्वीचा विराट होण्याचा सल्ला दिला आहे.
एका स्पोर्ट्स वेबसाइटशी बोलताना वॉनने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर भाष्य केले. तो म्हणाला, फाफ डुप्लेसिसने विराट कोहलीशी चर्चा केली असेल. आणि या चर्चेदरम्यान 10 वर्ष मागे जाण्याचा विराटला सल्ला दिला असेल. असा अंदाज वॉनने लावला.
तो पुढे म्हणाला, जेव्हा लग्न झाले नव्हते, एका मुलीचे वडील बनले नव्हते, तेव्हा प्रत्येक बॉलची संधी साधण्यासाठी मैदानावर विराट सज्ज असायचा. तु तुझे वय विसर आणि हेदेखील विसर की तु आत्तापर्यंत काय काय केलसं. असा सल्ला वॉनने यावेळी विराटला दिला.
विराट गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. जवळपास त्याला गेले तीन वर्ष कोणत्याची फॉर्मेटमध्ये शतक ठोकता आलेले नाही. तसेच, सध्या सुरु असलेल्या आयपीएल 15 सीझनमध्येती तो फ्लॉप ठरला आहे. आत्तापर्यंत त्याने 12 मॅचमध्ये 19.63 सरासरीने केवळ 216 रन केल्या आहेत.
विराटच्या या निराशजनक कामगिरीबद्दब वॉन पुढे म्हणाला, जर विराट 35 धावा करत असेल तर मोठा डाव खेळू शकतो. तो सध्या 0 ते 10 धावांमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. तो यासर्वातून बाहेर पडला त्याने पुन्हा तरुणपण दाखवले तर तो पुन्हा सर्वश्रेष्ठ बनू शकतो. असे मत वॉनने यावेळी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.