Venkatesh Prasad On Jay Shah 
क्रीडा

Asia Cup 2023: 'लाज वाटू द्या!...' IND vs PAK सामन्यासाठी एक नियम अन् इतरांसाठी वेगळा? दिग्गज खेळाडू भडकला...

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup Super 4 Match Reserve Day : आशिया कप 2023 स्पर्धेतील वाद थांबण्याचे नाव काय घेत नाहीत. प्रथम पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि BCCI यांच्यात या कार्यक्रमाबाबत भांडण झाले आणि आता फक्त सुपर-4 फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यावरून गदारोळ सुरू आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी सुपर फोर फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी फक्त राखीव दिवस ठेवल्याबद्दल आशियाई क्रिकेट परिषदेवर (ACC) टीका केली आहे.

एसीसीने शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवसही जाहीर केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबर रोजी प्रेमदासा स्टेडियमवर कोलंबो येथे होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे त्या दिवशी खेळ झाला नाही, तर पहिल्या दिवशी जिथे संपला होता तिथून 11 सप्टेंबरला सामना पुन्हा सुरू होईल.

माजी भारतीय गोलंदाजाने एसीसीच्या निर्णयावर टीका केली आणि म्हटले की चार देशांपैकी फक्त दोन संघांसाठी वेगळे नियम असणे अनैतिक आहे. व्यंकटेश यांनी X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिले की, लाज वाटू द्या... आयोजकांनी स्पर्धेची खिल्ली उडवली असून उर्वरित दोन संघांसाठी वेगवेगळे नियम असलेली स्पर्धा आयोजित करणे अनैतिक मानले आहे. न्यायाच्या नावाखाली तो पहिल्याच दिवशी रद्द केला तरच न्याय्य ठरेल. दुसर्‍या दिवशी आणखी पाऊस पडू दे आणि या दुर्भावनापूर्ण योजना यशस्वी होऊ नयेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण शेअर करावा लागला. हार्दिक पंड्याच्या 87 धावा आणि इशान किशनच्या 82 धावांच्या जोरावर भारतीय डाव 48.5 षटकात 266 धावांवर आटोपला. मात्र, त्यानंतर पावसाने हस्तक्षेप केला आणि पाकिस्तानला एकाही चेंडूचा सामना न करता सामना रद्द करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT