Venkatesh Prasad West Indies Vs India esakal
क्रीडा

Venkatesh Prasad WI Vs IND : पैसा अन् पॉवर आहे मात्र... प्रसादने विंडीजविरूद्ध 'सराव' करणाऱ्या टीम इंडियाचे कान उपटले

अनिरुद्ध संकपाळ

Venkatesh Prasad West Indies Vs India : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले आहे. पहिला सामना भारताने जिंकला खरा मात्र विंडीजने त्याही सामन्यात 115 धावांच आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे 5 फलंदाज गारद केले.

दुसऱ्या वनडे सामन्यात तर विंडीजने भारतीय संघाच्या सर्व मर्यादा उघड्या पाडल्या. भारताचा 6 विकेट्स राखून पराभव करत विंडीजने मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली. भारताच्या या पराभवानंतर टीम माजी खेळाडूंनी टीम इंडियाची चांगलीच खरडपट्टी केली. व्यंकटेश प्रसादने तर टीम इंडियाला बोचऱ्या शब्दात झापलं. (Team India ODI World Cup 2023)

काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद पाठोपाठ ट्विट करत टीम इंडियाची खरडपट्टी केली. व्यंकटेश प्रसाद म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटचा अपवाद वगळता इतर दोन फॉरमॅटमधील टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत सुमारच राहिली आहे.'

'भारताला बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका गमावावी लागली. टीम इंडियाने गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुमार दर्जाची कामगिरी केली. आपण ना इंग्लंडसारखा उत्साही संघ आहोत ना ऑस्ट्रेलिया सारखा आक्रमक संघ आहोत.' (Venkatesh Parsad News)

व्यंकटेश प्रसादच्या मते भारताने आपल्या वृत्तीत आणि दृष्टीकोणात बदल करून मोठे यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तो आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'पैसा आणि पॉवर असूनही आपल्याला छोट्या मोठ्या यशात समाधान मानायची सवय लागली आहे. आपण एक चॅम्पियन टीम बनण्याच्या खूप दूर आहोत.'

'सर्वच संघ जिंकणाऱ्यासाठीच खेळत असतात. टीम इंडिया देखील जिंकण्यासाठीच खेळते. मात्र कालानुरूप त्यांचा दृष्टीकोण आणि वृत्ती खराब कामगिरीला कारणीभूत आहे.'

विंडीजमध्ये 'सराव' कच्चा

भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकपचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे भारताचा वेस्ट इंडीज दौरा हा 'सराव' म्हणून संबोधला जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली होती. तर दुसऱ्या वनडे सामन्यात कमकूवत विंडीज बलाढ्य भारतावर वरचढ ठरली होती.

आता मालिकेतील निर्णायक तिसरा सामना हा 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारताकडून इशान किशनने सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT