Heath Streak Passed Away 
क्रीडा

Heath Streak : मी जिवंत...!, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी खोटी, जाणून घ्या प्रकरण

Kiran Mahanavar

Heath Streak : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक यांचे वयाच्या 49 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. अश्या बातम्या सकाळी आल्या होत्या. अशी माहिती खुद्द त्याचा माजी सहकारी हेन्री ओलांगा यांनी दिली होती. यानंतर त्या बातमीने क्रीडा विश्वात खळबळ उडाली.

सर्वांनाच धक्का बसला आणि त्यामुळेच भारतातील अनेक माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण खरं तर स्ट्रीक जिवंत आहे. हीथच्या मृत्यूची बातमी खुद्द हेन्री ओलांगा यांनी खोटी ठरवली आहे आणि त्यांची जुनी पोस्टही डिलीट केली.

हेन्री ओलांगा यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टमध्ये लिहिले की, मी पुष्टी करत आहे की हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. मी नुकतेच त्याच्याकडून ऐकले. तिसऱ्या पंचाने त्याला परत बोलावले आहे आणि तो जिवंत आहे मित्रांनो.

हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर हीथने डिसेंबर 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

त्याने शेवटची वनडे ऑगस्ट 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर 2005 मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीन वेळा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली होती.

त्या सामन्यात त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 32 षटकात 73 धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना 10 गडी राखून जिंकला.

हिथ स्ट्रीकने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 13 अर्धशतकं झळकावली.

याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 73 धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात 32 धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT