नवी दिल्ली- कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. फोगाटने सेमीफायनलमध्ये धडक दिली असून तिचे सिल्व्हर मेडल पक्कं झालं आहे. तिने क्युबाच्या युसनेइलिस गुजमैन हीचा ५-० ने पराभव केला आहे. मेडल नक्की झाल्याने भारतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिने यासंदर्भात पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे.
भारताच्या पहिल्या गोल्ड मेडलसाठी फिंगर्स क्रॉस करून ठेवले आहेत. विनेश कधी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होती, ज्यात 'मोदी तेरी कब्र खुदेगी' सारख्या घोषणा दिल्यानंतरही त्यांना संधी देण्यात आली होती. जेणेकरून त्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील. याशिवाय त्यांना बेस्ट ट्रेनिंग, कोच आणि इतर सुविधा देण्यात आल्या. हीच लोकशाही आणि एका महान नेत्याची सुंदरता आहे, असं ती पोस्टमध्ये म्हणाली आहे.
देशातील कुस्तीपटूंनी भाजप खासदाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी यासाठी साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन केलं होतं. यात विनेश फोगाटचा देखील समावेश होता. या पार्श्वभूमीवर कंगना रनौतने ही पोस्ट केली आहे.
विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कमाल केली. आता गोल्ड मेडलसाठी तिचा सामना होणार आहे. तिने गोल्ड मेडल जिंकल्यास कुस्ती प्रकारात असं करणारी ती पहिली भारतीय ठरेल. देशाला तिच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. शिवाय तिची कामगिरी आणि तिचा आत्मविश्वास पाहून ती मेडल आणणारच असा विश्वास भारतीयांना वाटू लागला आहे.
माजी कुस्तीपटू महावीर फोगाट यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय की, विनेश भारतासाठी गोल्ड जिंकूनच परत येईल. तिच्या विजयानंतर कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी जल्लोष केला आहे. सगळ्यांनी मिळून तिचा सामना पाहिला होता. विशेष म्हणजे विनेश फोगाटने ८२ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एकदाही न हरलेल्या सुसाकीचा पराभव केला आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.