Vikas Thakur celebrates silver medal in Sidhu Moosewala style SAKAL
क्रीडा

मेडल जिंकल्यावर विकासने केलं मुसेवाला स्टाईलमध्ये सेलिब्रेशन, वाहिली अनोखी श्रद्धांजली

मूसेवालाच्या हत्येनंतर दोन दिवस अन्न न खाल्लेल्या विकास ठाकूरने या पंजाबी गायकाच्या स्टाईलमध्ये मांडी मारून राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर जल्लोष केला.

Kiran Mahanavar

Vikas Thakur Celebrates Silver Medal in Sidhu Moosewala Style : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरूष 96 किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने रौप्य पदकाची कमाई केली. त्याने एकूण 346 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक पटकावून दिले. विकास ठाकूर खेळांसाठी सिद्धू मूसवालाची गाणी ऐकत आला होता. मूसेवालाच्या हत्येनंतर दोन दिवस अन्न न खाल्लेल्या विकास ठाकूरने या पंजाबी गायकाच्या स्टाईलमध्ये मांडी मारून राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर जल्लोष केला.

हिमाचल प्रदेशातील राजपूत जाट समुदायातील विकास ठाकूर राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर म्हणाला, पंजाबी थप्पी ही सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली होती. त्याच्या हत्येनंतर मी दोन दिवस जेवणही घेतले नव्हते. मी त्याला कधीही भेटलो नाही आणि आताही भेटू शकणार नाही, पण त्यांची गाणी नेहमीच माझ्यासोबत राहतील. इथे येण्यापूर्वीही मी हेच ऐकत होतो. मी त्यांचा नेहमीच मोठा चाहता राहीन. सिद्धू यांचा पंजाबमधील त्यांच्या घराजवळ 29 मे 2022 रोजी गोळ्या झाडून मृत्यू झाला होता.

वेटलिफ्टिंग 96 किलो पुरूष स्पर्धेत भारताच्या विकास ठाकूरने स्नॅच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात 149 किलो वजन उचलून यशस्वी सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 153 किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात विकास ठाकूरने 155 किलो वजन उचलले. विकास ठाकूरने स्नॅच प्रकारात 155 किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात 187 किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 191 किलोचा भार यशस्विरित्या पेलला. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याला 198 किलो वजन उचलण्यात अपयश आले. विकासने स्नॅचमध्ये 155 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 191 किलो असे एकूण 346 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT