भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडूंवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारपासून कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आता विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा थेट आरोप खेळाडूंनी केला आहे. याविरोधात खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली आहे.
कुस्तीपटूंचे म्हणणे आहे की, ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे खेळाडूंचे संपूर्ण करिअर, त्यांचे कुटुंब आणि भविष्य आता धोक्यात आले आहे. तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. तसेच क्रीडा मंत्रालय त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.