Vinesh Phogat Harish Salve esakal
क्रीडा

Vinesh Phogat Harish Salve Live: ज्येष्ठ वकील हरीश साळवे कुस्तीपटू विनेशसाठी लढणार? पाहा कधी फैसला येणार

Vinesh Phogat appeal live: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.

Swadesh Ghanekar

Vinesh Phogat disqualification appeal live: कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या अपात्रतेच्या निकालावर आता महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटात सलग तीन विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते. पण, फायनच्या दिवशी सकाळी तिचे वजन घेतले गेले, तर ते १०० ग्रॅम जास्तीचे आढळले आणि भारतीय कुस्तीपटूला अपात्र ठरवले गेले. फायनलची स्पर्धक पासून तिला थेट शेवटच्या बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला गेला. फोगाटने या विरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि उद्या याबाबतचा निर्णय येणे अपेक्षित आहे.

नेमकं घडलं तरी काय?

५० किलो वजनी गटात सलग तीन सामने खेळल्यानंतर विनेश फोगाटचे वजन दोन किलोने वाढले होते. ते कमी करण्यासाठी विनेश व तिच्या सपोर्ट स्टाफने भरपूर मेहनत घेतली. विनेश ती संपूर्ण रात्र झोपली नाही आणि दोरी उडी, धावणे, सायकल चालवणे असा व्यायाम तिने रात्रभर केला. सकाळी जेव्हा तिचे वजन केले गेले, ते १०० ग्रॅम अधिक दिसले आणि ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवले. तिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला फायनल खेळण्याची संधी दिली गेली.

विनेश फोगाटने याचिकेत काय म्हटले?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. विनेश फोगाटने केलेल्या अपीलमध्ये तिच्याबाबतच निर्णय येईपर्यंत फायनल थांबवावी अशी विनंती केली गेली होती. पण, लवादाने तसं करण्यास स्पष्ट नकार दिला. विनेशने किमान तिला रौप्यपदक दिले जावे अशी विनंती केली होती.

गुरुवारी सकाळी याबबातचा अंतिम निर्णय येणे अपेक्षित होते. पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार क्रीडा लवादाने तिचे अपील स्वीकारले आहे आणि उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता निर्णय येऊ शकतो.

हरीश साळवे केस लढवणार?

CAS ने विनेश फोगाटची याचिका स्वीकारली आहे आणि सुनावणीसाठी वकिलाची नियुक्ती करण्याची सूचनाही भारतीय कुस्तीपटूला केली आहे. भारत सरकार हरीश सावळे यांना या खटल्यात सहभागी करून घेण्याचा विचार करत आहेत, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

भारतीय ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्यांनी १ नोव्हेंबर १९९९ ते ३ नोव्हेंबर २००२ या कालावधीत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव यांचा खटलाही लढवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT