Vinesh Phogat disqualified esakal
क्रीडा

Vinesh Phogat disqualified: विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर कोणतं पदक मिळणार? नेमकं काय होणार?

Vinesh Phogat Missed olympic Medal Due To Weight Gain मंगळवारची मध्यरात्र भारतीयांना सुखावणारी होती, कारण विनेश फोगाटने कुस्तीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता, परंतु बुधवारी त्यांचा आनंद भंग झाला..

Swadesh Ghanekar

Vinesh Phogat Has Been Officially Disqualified Olympic 2024: ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात कुस्ती फायनल गाठणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूचा मान विनेश फोगाटकडून हिसकावला गेला आहे. कट्टर प्रतिस्पर्धींना एकेक करून चीतपट करत विनेश फायलमध्ये पोहोचली होती, परंतु तिचा आणि १४० कोटी भारतीयांचा आनंद क्षणिक ठरला. कारण, ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे वजन हे प्रत्यक्ष सामन्यात काही ग्रॅम वाढलेले आढळले आणि ऑलिम्पिक समितीने तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली.

नेमकं काय घडलं?

गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त होते. वजय नियंत्रात राखण्यासाठी तिने सर्व प्रयत्न केले. नियमानुसार स्पर्धेच्या दिवशी खेळाडूने त्याचं वजन कायम राखणे महत्त्वाचे आहेत. मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते. ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती आणि तिने नियमाचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले.

नियम काय सांगतो?

नियमांनुसार, कुस्तीपटूंना दोनदा वजन करावे लागते. प्राथमिक फेरीच्या दिवशी आणि अंतिम फेरीच्या सकाळी. काल विनेश ५०किलो वजनाच्या अनुज्ञेय मर्यादेत होती. तिचे वजन दिवसभरात वाढले असण्याची शक्यता आहे. तिला रात्रभर सुमारे २ किलो वजन कमी करावे लागले. आज सकाळी तिचे वजन 100 ग्रॅमने जास्त होते. त्यामुळे तिला नियमानुसार अपात्र ठरवले गेले.

IOA चं म्हणणं काय?

IOA ने एका निवेदनात म्हटले आहे की, “महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी खरी आहे आणि ती खेदजनक आहे. टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम ५० किलोपेक्षा जास्त झाले. यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. हातातील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायला आवडेल.”

मेडल मिळणार की नाही?

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियम क्रमांक ११ नुसार जो खेळाडू वजन कमी करणार नाही त्याला स्पर्धेतून बाहेर काढले जाईल. "एखाद्या खेळाडूने वजन (पहिल्या किंवा दुसऱ्या वेट-इन) मध्ये उपस्थित न राहिल्यास किंवा अयशस्वी झाल्यास, त्याला स्पर्धेतून बाहेर काढले जाईल आणि रँकशिवाय शेवटचे स्थान दिले जाईल."

याचा अर्थ विनेशलाही अपात्र ठरवण्यात आले आहे आणि तिला पदक गमवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT