India at Paris Olympic 2024 Vinesh Phogat in Final Live : मागील दोन वर्षांचा काळ कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यासाठी आव्हानात्मक राहिला... आखाड्यात तिला अपयश येत होतंच, परंतु मैदानाबाहेरील लढाईसाठी तिला रस्त्यावर उतरावलं लागलं.. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केलं केलं, मानसिक खच्चिकरणही झालं. पण, यातही 'दंगल गर्ल' मातीत पाय रोवून उभी राहिली आणि आज ऐतिहासिक भरारी घेतली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरी गाठून इतिहास घडवला. आतापर्यंत एकाही भारतीय महिला कुस्तीपटूला ऑलिम्पिक फायनल गाठता आली नव्हती.
विनेशने पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदवताना टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान मोडून काढले. जपानच्या खेळाडूने २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु विनेशने उल्लेखनीय कामगिरी केली आणि शेवटच्या पाच सेकंदात ही मॅच ३-२ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ( Women's Freestyle 50kg Semifinal)
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय खेळाडूला युक्रेनच्या ओक्साना लिव्हाचकडून कडवी टक्कर मिळाली. विनेशेने दुसऱ्या मिनिटाला युक्रेनच्या खेळाडूला टेक डाऊन करून २ गुण कमावले. दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा विनेशने टेक डाऊन करत ४-० अशी मजबूत केली. ओक्साना भारतीय खेळाडूचा पाय पकडून पदक दीड मिनिट असताना ओक्सानाने २ गुण घेतले. १४ सेकंद शिल्लक असताना विनेशने प्रतिस्पर्धीला मॅटवर आपटले आणि ७-५ अशी आघाडी घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ( 𝒇𝒊𝒓𝒔𝒕 𝑰𝒏𝒅𝒊𝒂𝒏 𝒘𝒐𝒎𝒂𝒏 𝒘𝒓𝒆𝒔𝒕𝒍𝒆𝒓 𝒕𝒐 𝒓𝒆𝒂𝒄𝒉 𝒂𝒏 𝑶𝒍𝒚𝒎𝒑𝒊𝒄 𝒇𝒊𝒏𝒂𝒍)
उपांत्य फेरीत तिच्यासमोर क्युबाची कुस्तीपटू गुजमन लोपेझ युस्नेयलिसचे आव्हान होते. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळावर भर दिला, परंतु संधी मिळताच विनेशने क्यूबन खेळाडूला मॅटवर पाडले, परंतु प्रतिस्पर्धीच्या भक्कम बचावामुळे विनेशला गुण घेता नाही आला. विनेशचा भक्कम विरुद्ध गुजमनचा बचाव असा खेळ सुरू होता. विनेशने पहिला तांत्रिक गुण मिळवून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत बचावात्मक खेळ झाला आणि विनेश १-० अशी आघाडीवर राहिली.
दुसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंकडून आक्रमणाची अपेक्षा होती. दोन्ही खेळाडू एकमेकिंचे डावपेच चांगल्या पद्धतीने ओळखून होत्या आणि त्यामुळे गुणासाठी दोघींनाही संघर्ष करावा लागला. विनेशच्या आक्रमणाला गुजमनकडून दमदार बचावाने उत्तर मिळाले. पण, विनेशने बाजी मारली आणि अप्रतिम पकड घेताना ४ गुण खात्यात जमा केले. विनेशने ५-० अशी आघाडी घेतली होती आणि शेवटच्या ७० सेकंदात ती तिला टिकवायची होती. शेवटच्या ३० सेकंदात अप्रतिम बचाव करून विनेशने फायनलमध्ये प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.