Vinesh Phogat | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Vinesh Phogat Demand Silver : विनेश फोगाटचे अपात्रतेच्या निर्णयावर मोठं पाऊल, रौप्यपदकाची केली विनंती; निर्णय कधी घ्या जाणून

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Vinesh Phogat controversy : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या अपात्रतेच्या निर्णयाने बुधवारचा दिवस गाजला... मंगळवारी ५० किलो वजनी गटात सलग तीन बाऊट जिंकून फायनमध्ये धडक देणाऱ्या विनेशवर बुधवारी सकाळी अपात्रतेची कारवाई केली गेली. तिला फायनलमधून बाद करत पदकाचेही स्वप्न भंगले... १०० ग्रॅम अधिक भार तिला थेट पहिल्या बाकावर जाऊन बसवणारा ठरला. जागतिक कुस्ती महासंघ व ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, कुस्तीपटू विनेश फोगाटनेच क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे.

मंगळवारीर तीन बाउट्समध्ये भाग घेतल्यानंतर आणि दिवसभर स्वतःला रिकव्हर केल्यानंतर, विनेशचे वजन वाढल्याची शक्यता लक्षात आली होती. अंतिम वजनासाठी आवश्यक वजन पूर्ण करण्यासाठी तिला रात्रभर अंदाजे २ किलो वजन कमी करावे लागले. विनेशला तिच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर घामाच्या सूटमध्ये काहींनी पाहिले आणि तिने रात्रभर जास्तीचे वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. प्रयत्नांनंतरही विनेशचे वजन १०० ग्रॅम वजनाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

विनेशने मागितली दाद (Vinesh Phogat appeals)

विनेश फोगाटने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादात दाद मागितली आहे आणि किमान तिला रौप्यपदक दिले जावे अशी मागणी तिने केली आहे. गुरुवारी सकाळी याबबातचा अंतिम निर्णय येण्याचा अंदाज आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. क्रीडा लवादाने हा निर्णय विनेशच्या बाजूने दिल्यास तिला संयूक्तपणे रौप्यपदक दिले जाईल. ऑलिम्पिक समितीने ५० किलो वजनी गटाची फायनल स्थगित करण्यास नकार दिला आहे. विनेशने फायनल खेळण्याची परवानगी मागितली होती, परंतु आता याचिका जिंकल्यास विनेशला संयुक्तपणे रौप्यपदक मिळू शकते.

CAS म्हणजे काय? What is Court of Arbitration for Sport (CAS)

१९८४ मध्ये कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) ची स्थापना झाली. ही एक स्वतंत्र संस्था आहे जी, लवाद किंवा मध्यस्थीद्वारे खेळाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. याचे मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड येथे आहे आणि न्यूयॉर्क शहर आणि सिडनी येथे न्यायालये आहेत, ऑलिम्पिक यजमान शहरांमध्ये तात्पुरती न्यायालये स्थापन केली आहेत.

CAS कोणत्याही क्रीडा संस्थेपासून स्वतंत्र आहे आणि आंतरराष्ट्रीय लवाद परिषद (ICAS) च्या प्रशासकीय आणि आर्थिक अधिकाराखाली कार्यरत आहे. लवाद पॅनेलमध्ये तीन मध्यस्थ असतात. प्रत्येक पक्ष एक मध्यस्थ निवडतो आणि तिसरा संबंधित विभागाच्या अध्यक्षाद्वारे निवडला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT