Vinesh Phogat Love Story Husband Somvir Rathee sakal
क्रीडा

Vinesh Phogat : विनेशची Love Story! रेल्वेत प्रेम, एअरपोर्टवर प्रपोज, लग्नात अष्टपदी; कोण आहे सोमवीर राठी?

Vinesh Phogat Paris Olympic 2024 News : स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीला कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर तिने ही मोठी घोषणा केली.

Kiran Mahanavar

Vinesh Phogat Retires From Wrestling : स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीला कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर तिने ही मोठी घोषणा केली.

विनेश फोगाटला जास्त वजन असल्यामुळे महिलांच्या 50 किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटूने एकाच दिवसात जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना पराभूत करून इतिहास रचला होता.

विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली, पण सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विनेशला दुसऱ्या दिवशी सकाळी मोठा धक्का बसला. सध्या कठीण काळातून जात असलेल्या विनेशसाठी पती सोमवीर राठी हा तिचा सर्वात मोठा आधार आहे. आणि त्यांची प्रेम काहानी तर खुपच रंजक आहे.

रेल्वेत प्रेम

विनेश आणि सोमवीर राठी यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती. दोघेही रेल्वेत नोकरी करत होते. पूर्वी दोघे फक्त कामानिमित्त भेटत होते. मात्र, नंतर मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.

एअरपोर्टवर प्रपोज

2018 मध्ये विनेशने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इंडोनेशियामध्ये या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विनेश परतल्यावर सोमवीर राठीने सरप्राईज प्लॅन केला. सोमवीरने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनेशला प्रपोज केले.

2018 मध्येच लग्न

विनेश फोगट आणि सोमवीर राठी यांचा विवाह 14 डिसेंबर 2018 रोजी त्यांच्या मूळ गावी चरखी दादरी, हरियाणा येथे झाला. हे लग्न साधेपणाने होते आणि विनेश आणि सोमवीरच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. विनेश आणि सोमवीरची आठवी फेरी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ' ला समर्पित होती.

कोण आहे सोमवीर राठी?

सोमवीर राठी हा स्वतः पण एक कुस्तीपटू राहिला आहे. सोमवीरचा जन्म हरियाणातील सोनीपत येथे झाला. राठीने सोनीपतच्या खरखोडा येथील नर्सरीपासून कुस्तीला सुरुवात केली. त्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर सोमवीर रेल्वेत नोकरीला लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT