विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात क्युबाच्या गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले.
तत्पूर्वी, तिने आतापर्यंतची अजेय गतविजेती युई सुसाकी हिचा पराभव करून मोठा अपसेट केला होता आणि युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
हीच लय कायम राखत त्याने लोपेझचा 5-0 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. या स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी होणार आहे. विनेशला अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
दरम्यान विनेश फोगटने ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रेल केले आहे.
गेल्या ऑलिम्पिकपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पदक विजेत्या खेळाडूशी त्याच्या विजयानंतर फोनवरून साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात.
दरम्यान ऑलिम्पिकपूर्वी महिला कुस्तीपटूंवर ब्रिजभूषण सिंहने केलेल्या अत्याचाराविरोधात विनेश फोगटसह महिला व पुरूष कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. यावर भाजप नेत्यांसह समर्थकांनी या कुस्तीपटूंना देशद्रोही म्हटले होते.
कुस्तीपटूंच्या आंदोलनाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही दखल घेतली नव्हती असा कुस्तीपटूंचा दावा आहे.
आता विनेशने या स्पर्धेत आपले पदक पक्के केले आहे. त्यामुळे पंतप्रधान तिला फोन करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हाच धागा पकडत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोक्याला हात लावलेला एक फोटो एक्सवर शेअर केला आहे. आणि त्यासह 'To call or not to call?' असे कॅप्शन दिले आहे.
यावेळी एका युजरने पंतप्रधान मोदी हातात फोन घेऊन बसलेला एक फोटो शेअर करत लिहिले की, "मला माफ करा विनेश बेटा... माझ्याशी एकदा बोल, नाहीतर मी चटई घेऊन जंतरमंतरला जाईन."
पुढे आणखी एका युजरने लिहिले की, "विनेश फोगट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आयकॉनिक कॉलची वाट पाहत आहे. अभी मजा आयेगा ना भिडू."
गेल्या वर्षी म्हणजे 18 जानेवारी 2023 रोजी जेव्हा विनेशसह भारतातील काही आघाडीचे कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाला बसले तेव्हा संपूर्ण देश हादरला होता.
महिला खेळाडूंनी कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. प्रकरण वाढल्यावर बृजभूषण यांना खुर्ची गमवावी लागली.
भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 21 डिसेंबर रोजी ब्रिजभूषण यांच्या जवळचे संजय सिंग अध्यक्ष म्हणून निवडून आले. संजय सिंग अध्यक्ष होताच विनेशची सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. त्यांच्यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला.
यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केले. तदर्थ समिती स्थापन झाल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केले.
मात्र, कुस्तीपटूंनी संजय सिंग यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शवली आणि आयओसीने निलंबन मागे घेतले. मात्र, आरोप निश्चित झाल्यानंतर बृजभूषणला शिक्षा झाली नाही, तर विनेशने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणाही केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.