Vinesh phogat vs sarah hildebrandt  esakal
क्रीडा

Vinesh Phogat Final Match: विनेश फोगाटच्या 'Golden' मॅचसाठी व्हा सज्ज; पाहा कुठे व किती वाजता पाहता येणार लढत

Vinesh Phogat vs Sarah Hildebrandt Wrestling Final Olympics 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरच्या दोन आणि स्वप्नील कुसाळेच्या कांस्यपदकानंतर भारताला आता सुवर्णपदकाचे वेध लागले आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट त्यासाठी निमित्त ठरतेय.

Swadesh Ghanekar

Where & At What Time You Can Watch Wrestling Match Live: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि अमेरिकेची साराह हिल्डेब्रांट यांच्यात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजगी गटाची फायनल होणार आहे. विनेशने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश करून इतिहास रचला... फायनल खेळणारी ती पहिली महिला कुस्तीपटू आहे... रिओ, टोकियो आणि पॅरिस अशा सलग तीन ऑलिम्पिक खेळणारीही ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.. आता तिचे पाऊल इतिहास घडविण्याच्या दिशेने पडणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय भारतीय खेळाडूने अव्वल मानांकिस सुसाकीला चीतपट केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिचे आणि उपांत्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.

अमेरिकेची साराहला या स्पर्धेत सहावे मानांकन मिळाले आहे आणि तिने पहिल्या सामन्यात अल्जेरियाच्या इब्तीसेन डोडूवर तांत्रिक आघाडीवर विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या फेंग झिंकीचा ७-४ असा आणि उपांत्य फेरीत मोंगोलिया डोल्गोर्जवीन ओत्गोंजर्गालचा ५-० असा पराभव केला.

विनेशच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदकं आहेत आणि तिने २०१८ च्या आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले आहे. २०२३च्या आशियाई स्पर्धेत तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. याशिवाय तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदकं आहेत आणि दोन्ही पदकं तिने ५३ किलो वजनी गटात जिंकलेली आहेत.

भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत दोन रौप्य व पाच कांस्यपदकं जिंकली आहेत. २०१६ मध्ये साक्षी मलिक ही भारताकडून कुस्तीत पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.

सामन्याची वेळ...

विनेश फोगाटची फायनल मध्यरात्री १२.३० वाजता होण्याची शक्यता आहे. कुस्तीतील विविध गटांचे उपांत्यपूर्व व अंतिम फेरीचे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ९.४५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यानुसार विनेशची मॅच सुरू होण्यास मध्यरात्रीचे १२.३० वाजण्याची शक्यता आहे.

सामना कुठे पाहाल?

विनेश व साराह यांच्यातला फायनल सामना JioCinema वर पाहता येईल. त्याशिवाय Sports18 Network चॅनेलवरही थेट प्रक्षेपण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT