नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket Team) इंग्लंडमध्ये झालेल्या 2017 च्या महिला वर्ल्डकपमध्ये (Women World Cup 2017) धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघाला पराभवाची धूळ चारली होती. मात्र त्यांना फायनमध्ये इंग्लंडकडून फक्त 9 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये (Semi Final) महिला क्रिकेट संघाला साधं जेवण (Meal) देखील मिळालं नव्हतं असा दावा बीसीसीआयचे (BCCI) तत्कालिन प्रशासक विनोद राय यांनी असा दावा केला आहे. त्यांनी त्यावेळी मी महिला क्रिकेटसाठी फार काही करू शकलो नाही याचा खेद असल्याचेही त्यांनी सांगितले. विनोद राय यांनी नुकतेच आपले नॉट जस्ट ए नाईट वॉचमन हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
विनोद राय यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला असं वाटत नाही की आपण महिला क्रिकेटला फारसं महत्व देत आहोत. महिला क्रिकेटला 2006 पर्यंत कोणी गांभिऱ्याने घेत नव्हतं. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरूष आणि महिला क्रिकेट एसोसिएशन एकत्र करण्याचा निर्णय घेतला. दरमयान, या मुलाखतीत विनोद राय यांनी सांगितले की, ज्यावेळी महिला क्रिकेट संघाला पुरूष क्रिकेट संघाचे कपडेच अल्टर करून किंवा तसेच वापरण्यास देण्यात येत होते हे ऐकून त्यांना धक्का बसला. त्यावेळी त्यांनी नाईकी या कपडे पुरवणाऱ्या कंपनीला फोन करून ही चांगली गोष्ट नसल्याचे सांगितले. तुम्हाला महिलांसाठी वेगळ्या पद्धतीचा ड्रेस डिझाईन करावा लागले असे सांगितले.
विनोद राय यांनी 2017 च्या महिला वर्ल्डकप दरम्यानचा एक प्रसंग देखील सांगितला. ते म्हणाले की, 'हरनमप्रीत कौरने 2017 च्या वर्ल्डकपमध्ये 171 धावांची नाबाद खेळी करेपर्यंत मी महिला क्रिकेटकडे फारसे लक्ष दिले नव्हते. राय पुढे म्हणाले की, हरमनप्रीतने त्यांना सांगितले की तिचे मसल पूल झाले होते. त्यामुळे ती जोरात धावू शकत नव्हती. तिने त्यावेळी मोठे फटके मारण्याचा निर्णय घेतला. हरमनने सांगितले की त्यांना इंग्लंडमध्ये जेवण देखील मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सकाळी नाश्त्याला फक्त समोसे खालले होते. राय यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, महिला संघाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात हॉटेलमध्ये जेवण देखील मिळाले नव्हते. त्यामुळे सेमी फायनल सारख्या सामन्यात संघाला समोसा खाऊन आपली भूक भागवावी लागली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.