नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. (India Tour South Africa) कसोटी संघ मुंबईत बायो बबलमध्ये (Bio Bubble) दाखल झाला आहे. मात्र भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अजूनही संघासोबत जोडला गेलेला नाही. त्यामुळे माध्यमात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआयला (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान एक छोटा ब्रेक मिळावा अशी विनंती केल्याचे समोर येत आहे.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्याला ब्रेक हवा आहे. जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल अशी विनंती केली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची (Anushka Sharma) मुलगी वामिका (Vamika) ही येत्या 11 जानेवारीला एका वर्षाची होत आहे.
दरम्यान, बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी 'हो विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान एका छोटा ब्रेक मिळावा अशी विनंती बीसीसीआयकडे केली आहे. त्याला जानेवारी महिन्यात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. याचा अर्थ तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसी सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता नाही.' असे सांगितले.
गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने (BCCI) भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड केली होती. आता विराट कोहली फक्त भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करेल. विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्डकपपूर्वीच भारतीय टी 20 संघाचे कर्णधाबपद सोडले होते. मात्र एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची विराटची अजूनही इच्छा होती.
बीसीसीआय (BCCI) आणि निवडसमितीने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असावा असा निर्णय घेत एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपले. विराट कोहलीला एकदिवसीय संघाचे नेतृत्व स्वतःहून सोडण्यासाठी बीसीसीआयने काही वेळही दिला होता. मात्र विराटने अशी घोषणा केली नाही. त्यानंतर बीसीसीआयने आपला निर्णय जाहीर केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.