India Tour Of South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी पासून रंगणार आहे. त्याआधी टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची विराट सेनेला संधी (Virat Kohli and SENA) आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकला तर विराट कोहलीच्या नावे खास विक्रमाची नोंद होईल. दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल.
विराट कोहलीनं (Virat Kohli) आतापर्यंत 67 कसोटी (Test) सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात 40 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर 16 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही आकडेवारी विराट कोहलीला यशस्वी कर्णधार ठरवण्यास पुरेशी आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेतील मालिका विजय हा त्याच्या शिरेपेचात एक मानाचा तूरा ठरेल. भारतीय संघाने जर दुसरा कसोटी सामना जिंकला तर विराट कोहली ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टीव वॉचीही बरोबरी करेल.
सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार
• ग्रॅहम स्मिथ: एकूण 109 सामन्यात 53 विजय
• रिकी पॉटिंग: एकूण 77 सामन्यात 48 विजय
• स्टीव्ह वॉ: एकूण 57 सामन्यात जीत 41 विजय
• विराट कोहली: एकूण 67 सामन्यात 40 विजय
विराट कोहली शतकाचा दुष्काळ संपवून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेच ठरेल. तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना कोहलीसाठी शंभरावा कसोटी सामना असेल. त्यामुळे एकदंरित हा दौरा विराट कोहलीसाठी खास असाच आहे.
'विराट' शतकी दुष्काळ संपणार...
मागील वर्ष विराट कोहलीसाठी संघर्षमय राहिले. वैयक्तिक शतकापासून तो गेल्या दोन वर्षांपासून वंचित राहतोय. सेंच्युरियनच्या मैदानात त्याची सेंच्युरी पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पण तो अर्धशतकही करु शकला नाही. 2019 पासून त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळालेले नाही. जर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विराट दुष्काळ संपला तर नव्या वर्षाची सुरुवात भन्नाट निश्चितच होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.