Virat-Anderson-Robinson 
क्रीडा

विराटला अँडरसन अन् रॉबिन्सनची गोलंदाजी कशी खेळावी कळतच नाही!

विराज भागवत

नासिर हुसेनने विराटला डिवचलं, वाचा अजून काय म्हणाला...

Ind vs Eng Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली Virat Kohli) सध्या चांगल्या लयीत (Out of Form) नसल्याचं दिसतंय. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत विराटची बॅट चालली नाही. पण किमान भारताने (Team India) चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे विराटच्या नेतृत्वशैलीचे (Captaincy) कौतुक झाले. पण तिसऱ्या सामन्यात (3rd Test) मात्र विराटसेना सपशेल अयशस्वी ठरली. भारतीय संघाला तब्बल १ डाव आणि ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव पचवून मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात (Ind vs Eng Test Series) भारताला यजमानांना तोंड द्यायचे आहे. अशा वेळी इंग्लंडचा (England) माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) याने विराट कोहलीवर टीका करून त्याला एका अर्थी डिवचल्याचीच चर्चा आहे.

"विराट कोहली यंदाच्या कसोटी मालिकेत अजूनही स्थिरावलेला दिसत नाही. कोणते चेंडू सोडावेत आणि कोणते खेळावेत याबद्दल त्याच्या मनात कायम संभ्रम दिसून येतोय. या मालिकेत असे अनेक चेंडू होते जे त्याने सोडायला हवे होते, पण त्याने ते चेंडू खेळले. त्याच्यात मला थोडासा तंत्रशुद्धपणाचा अभाव दिसतोय. मी वेळोवेळी याबद्दल बोललो आहे. तशातच त्याच्या पायाची हालचाल हादेखील एक मोठा मुद्दा आहे. अँडरसन आणि रॉबिन्सनच्या गोलंदाजीचा सामना करणं विराटला कठीण जातंय हे स्पष्ट दिसतं", असे नासिर हुसेन म्हणाला.

Virat Kohli

"विराटने आतापर्यंत या मालिकेत उठावदार खेळी केलेली नाही. अँडरसन आणि रॉबिन्सन या दोन्ही गोलंदाजांनी विराटला चांगलेच पांगवले आहे. त्यांच्या गोलंदाजीच्या वेळी कोणता चेंडू खेळावा आणि कोणाचा चेंडू सोडावा हेच विराटला कळत नाही. इनस्विंगर चेंडू खेळावा की सोडून द्यावा हेच त्याला कळत नसतं. यालाच दर्जेदार गोलंदाजी म्हणतात. मालिकेत पुढेदेखील यांची गोलंदाजी कोहलीसाठी डोकेदुखी ठरेल", असा विश्वास नासिर हुसेनने व्यक्त केला.

विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की भारतीयांना पुनरागमन कसं करायचं ते नीट माहिती आहे. अशा परिस्थितीत नासीर हुसेनच्या डिवचण्यानंतर विराट उर्वरित दोन सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT