Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : विराटचा कर्णधारपद सोडण्यास नकार; बीसीसीआयकडून उचलबांगडी?

विराटचा कर्णधारपद सोडण्यास नकार; बीसीसीआयकडून उचलबांगडी?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना अजून एक महत्त्वाची घोषणा केली. विराट कोहली (Virat Kohli) आता एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणार नाही. टी 20 प्रमाणेच एकदिवसीय संघाचेही नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपण्यात आले. कसोटीतही उपकर्णधारपद रोहित शर्माकडेच देण्यात आले आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या अजिंक्य रहाणेकडून (Ajinkya Rahane) कसोटीचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले.

पण, कालच्या सर्व घडामोडीवरुन विराट कोहलीने (Virat Kohli) स्वतःहून एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडलेले नाही तर बीसीसीआयने (BCCI) त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्याचे स्पष्ट जाणवते. यापूर्वी विराट कोहीलने टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याचे स्वतःहून घोषित केले होते. एकदिवसीय संघाबाबत थेट बीसीसीआयनेच अनपेक्षितरित्या घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीला बीसीसीआयने (BCCI) विराट कोहली (Virat Kohli) स्वतःहून एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा करले यासाठी 48 तास वाट पाहिली होती. मात्र विराटकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही अखेर बीसीसीआयने रोहित शर्माकडे (Rohit Sharma) एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले.

बीसीसीआयने या संदर्भात दिलेल्या वक्तव्यात फक्त 'निवड समितीने पुढचा विचार करुन रोहित शर्मा टी 20 आणि एकदिवसीयचेही कर्णधारपद सोपवण्यात येत आहे.' इतकाच उल्लेख केला होता. विराट कोहलीला मायदेशात होणाऱ्या 2023 च्या वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. मात्र बीसीसीआयने एकाच घोषणेने त्याची ही इच्छा मारुन टाकली.

ज्यावेळी भारत टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला त्यावेळीच विराट कोहलीचे (Virat Kohli) एकदिवसीय कर्णधारापद धोक्यात आले होते. बीसीसीआयने गेल्या काही वर्षांपासून कर्णधाराला सन्मानपूर्वक वागणूक दिली होती. मात्र आता झालेल्या घडामोडी पाहता विराट कोहलीने बीसीसीआयला मला हटवून दाखवा असा पवित्रा घेतलेला दिसतो. बीसीसीआयनेही (BCCI) मग असेच करुन दाखवले. बीसीसीआयपुढेही दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

विराट कोहलीची (Virat Kohli) कर्णधार म्हणून कारकिर्द पद्धतशीरपणे सुरु झाली होती. महिंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) विराट कोहलीला पहिल्यांदा एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले होते. 2019 च्या वर्ल्डकप पर्यंत धोनी त्याच्या सोबत होता. त्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचे एकहाती नेतृत्व केले. त्याने आपल्या मताप्रमाणेच निर्णय घेतले. त्यामुळेच अनिल कुंबळे (Anil Kumble) याच्यासारख्या दिग्गज खेळाडू प्रशिक्षक म्हणून लाभला असतानाही विराट कोहलीने हट्टाने प्रशिक्षक बदलायला लावला.

दरम्यान, बीसीसीआयमधील (BCCI) सर्वोच्च नेतृत्वात बदल झाला. एक यशस्वी कर्णधार असलेलाच खेळाडू बीसीसीआयचा अध्यक्ष झाला आणि गोष्टी बदलू लागल्या. आता विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT