भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी २० पाठोपाठ कसोटी संघाचे नेतृत्व देखील सोडले. त्याने नेतृत्व सोडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कारण कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याच्या नेतृत्वात भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले होते. तो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होता. विराट कोहलीने नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केल्यापासून क्रिकेट (Cricket) वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. विराटने असे अचानक कसोटी संघाचे नेतृत्व कसे काय सोडले असा सर्वांचा सूर होता. (Virat Kohli First Statement After Stepping Down as Test Captain)
आता या सर्वांवर खुद्द विराट कोहलीनेच उत्तर दिले आहे. विराट कोहली कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते.' तो पुढे म्हणाला की, 'लोकं याने काय केले? असे म्हणू शकतात. पण, ज्यावेळी आता पुढे जायला हवे आणि अजून काहीतरी मिळवायला हवे असा विचार करता त्यावेळी तुमचे तुमचे काम पूर्ण झाले आहे अशी भावाना होते.'
विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत (Virat Kohli Captaincy) अजून एक गोष्ट बोलली. तो म्हणाला की, 'तुम्हाला लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचे नसते.' विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही (Ricky Ponting) विराटच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र तो पुढे असं ही म्हणाला की, विराटच्या निर्णयानंतर मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. त्यावेळी मला असे वाटले की मी २ वर्ष जास्त कॅप्टन्सी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.